शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

३३७८ अर्ज वेटिंगवर

By admin | Updated: December 13, 2015 01:53 IST

कृषिपंपासाठी आलेले ३३७८ अर्ज अद्याप वेटिंगवरच आहेत. येत्या जूनपर्यंत या सर्व कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे.

जूनपर्यंत मुदतवाढ : कृषिपंपाचे २६८८ नवीन प्रस्ताव दाखलगोंदिया : कृषिपंपासाठी आलेले ३३७८ अर्ज अद्याप वेटिंगवरच आहेत. येत्या जूनपर्यंत या सर्व कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेले ६९० अर्ज असून उर्वरित २६८८ अर्ज चालू आर्थिक वर्षात दाखल झालेले आहेत. शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने शेतीवर विपरीत परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मात्र सिंचनासाठी पाणी घेणे म्हणजे कृषिपंपांची गरज पडते. पण त्यासाठी वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.आपल्या कृषिपंपांना अधिकृृत वीज मिळावी यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीकडे मार्च २०१५ पर्यंत असे २८२० अर्ज प्रलंबीत होते. यातील २१३० अर्जांना वीज वितरण कंपनीकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वीज जोडणी देण्यात आली. तर उर्वरीत ६९० व आॅगस्ट २०१५ पर्यंत आलेले असे एकूण ३३७८ अर्ज सध्या वीज वितरण कंपनीकडे प्रलंबीत आहेत. कंपनीकडे अर्ज केल्यानंतर त्यांची डिमांड सुद्धा शेतकऱ्यांनी भरलेली आहे. मात्र त्यांना कनेक्शन देण्यात आलेले नसल्याने पैसे भरूनही वाट बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. विशेष म्हणजे वेटिंगवर असलेल्या या अर्जांना लवकरात लवकर वीज जोडणी मिळावी. तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना त्यांचे हक्काचे वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीकडून आता कामाला गती दिली जात आहे. कंपनीने या प्रलंबित अर्जांना वीज जोडणी देण्यासाठी येत्या सहा महिन्यांचे टार्गेट घेतले आहे. जून महिन्यापर्यंत हे सर्व ३३७८ कृषीपंपांचे अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील मार्च २०१५ मध्ये उरलेल्या ६९० अर्जांना मार्च २०१६ पर्यंत क्लियर करण्याचे टार्गेट कंपनीने ठरविले आहे. तर नव्याने आलेल्या २६८८ अर्जांना जूनपर्यंत वीज जोडणी देण्याचे ठरविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)अर्जदार शेतकऱ्यांना पाठविले पत्र डिमांड भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा कधी कनेक्शन येणार याकडे लागल्या आहेत. अशात लवकर कनेक्शन मिळावे यासाठी ते मध्यस्थाला पकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना समोरच्या व्यक्तीला ‘खर्च-पाणी’ द्यावा लागतो. हे प्रकार घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने सर्व अर्जधारक शेतकऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात अर्जदारांना ठरविलेल्या कालावधीत कनेक्शन दिले जाणार असल्याने त्यांनी मध्यस्थांपासून दूर राहावे तसेच कनेक्शनसाठी लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या साहित्याची खरेदी व वाहतूक करू नये असे सूचविले आहे.उर्जामंत्र्यांच्या आदेशाला खोसप्टेंबर महिन्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदियात आले असताना त्यांनी जुन्या प्रलंबित प्रस्तावांना डिसेंबरपर्यंत कनेक्शन देण्याची तर नवीन प्रस्तावांना मार्च २०१६ पर्यंत निकाली काढण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ऊर्जामंत्र्यांच्या त्या घोषणेला खो देत हा कालावधी जूनपर्यंत वाढविण्यात आला.