शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

1634 जागांसाठी 3278 जणांनी अर्ज दाखल केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले.

ठळक मुद्देअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी केली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. एकूण १६३४ जागांसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तहसील कार्यालय आणि आपले सेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३२७८ एकूण उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले. त्यामुळे तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे प्रशासनाची सुध्दा काही काळ धावपळ उडाली होती. अर्जातील संपत्तीचा तपशिल भरण्यासाठी उमेदवारांना बरीच अडचण जात असल्याचे चित्र होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपंत्री जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ झाली. रात्री ९ वाजतापर्यंत २५३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 

रात्री उशीरापर्यंत स्विकारले उमेदवारी अर्ज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत काही तालुक्यात उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरुच होती. त्यामुळे तहसील कार्यालय सुध्दा रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याचे चित्र होते. 

१८ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतच्या १६३४ जागांसाठी जिल्ह्यातील ३२७८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत हे चित्र स्पष्ट होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यानंतर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक