शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींमध्ये २७ ला पदावरोहण

By admin | Updated: November 19, 2015 02:14 IST

मतदानाचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेल्यानंतरही सत्तेच्या खुर्चीपासून दूर असलेल्या पदाधिकाऱ्यांना पदारूढ होण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ‘

अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरणार : विशेष सभेचे आयोजनगोंदिया : मतदानाचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेल्यानंतरही सत्तेच्या खुर्चीपासून दूर असलेल्या पदाधिकाऱ्यांना पदारूढ होण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ‘लोकमत’ने वर्तविलेल्या भाकितानुसार येत्या २७ नोव्हेंबरला नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असून त्यासाठी चारही नगर पंचायतींमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या चार नगर पंचायतींच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या प्रत्येकी १७ सदस्यांची विशेष सभा दि.२७ ला दुपारी १२ वाजतापूर्वी आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. संबंधित नगर पंचायतींच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे उपविभागीय अधिकारी हेच अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीतही पिठासीन अधिकारी राहणार आहे. नगर पंचायतींच्या कार्यालयात बहुमताने ही निवड केली जाणार आहे.कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे कोणत्या नगर पंचायतीत कोणाची सत्ता बसणार आणि कोणाला विरोधकांची भूमिका वठवावी लागणार याकडे समस्त जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.ग्रामपंचायती बरखास्त होऊन नगर पंचायती अस्तित्वात आल्यापासून प्रशासक कारभार पाहात आहेत. मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग आणि इतर कामांचा बोझा पाहता नगर पंचायतींमधील अनेक कामे रखडली आहेत. ही रखडलेली कामे मार्गी लागावी यासाठी पदाधिकारी सत्तारूढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक लवकर घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिला सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. कोणताही अनुभव नसताना या महिला नगर पंचायतींची धुरा कशा सांभाळतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सदस्य जाणार सहलीवर?चारही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तेचे जुगाड जमविण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. आता प्रत्यक्ष सत्तारूढ होण्याची तारीख जाहीर झाल्यामुळे संख्याबळाचे गणित जमविलेल्या पक्षाच्या सदस्यांना एकत्रितपणे सहलीवर अज्ञात ठिकाणी पाठविले जाण्याची शक्यता आहे. ऐनवेळी सत्तेचा घास कोणी हिरावू नये यासाठी ही खबरदारी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती महिला, सडक अर्जुनी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), देवरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोरेगावात खुल्या प्रवर्गातील महिला नगर पंचायत अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. या महिलांना केवळ नामधारी ठेवून स्वत: कारभाराची सूत्रे हलविण्याचे काही दिग्गजांचे मनसुबे निवडणुकीत हार खावी लागल्याने धुळीस मिळाले. मात्र नामनिर्देशित सदस्यांच्या रूपाने त्यांना सत्तेचे भागीदार होण्याची संधी असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.