शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

परिणय सूत्रात बांधली जाणार २५ जोडपी

By admin | Updated: April 30, 2016 01:48 IST

बौद्ध सामूहिक विवाहाचे प्रथम संस्थापक अ‍ॅड. ए. बी. बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १८८९ मध्ये (सम्राट बौद्ध विहार) प्रभात वाचनालय, गांधी वार्ड गोंदिया येथील सभेत ....

विविध समित्या गठित : रविवारी बौद्ध सामूहिक विवाह गोंदिया : बौद्ध सामूहिक विवाहाचे प्रथम संस्थापक अ‍ॅड. ए. बी. बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १८८९ मध्ये (सम्राट बौद्ध विहार) प्रभात वाचनालय, गांधी वार्ड गोंदिया येथील सभेत बौद्ध सामूहिक विवाह आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. आता बौद्ध सामूहिक विवाहाचे नियमित हे २८ वे वर्ष आहे. १ मे रोजी सकाळी ११.३० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश परिसर स्थळ भीमघाट येथे बौद्ध पद्धतीने २५ जोडप्यांना मंगल परिणयाच्या सूत्रात बांधण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.ए.बी. बोरकर राहतील. याप्रसंगी प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री तथा खा. प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. गोपालदास अग्रवाल, आ. राजेंद्र जैन, अ‍ॅड.के.आर. शेंडे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, के.बी. चव्हाण, सुशीला भालेराव उपस्थित राहतील.भीमघाट परिसर सुसज्ज करण्यासाठी बौद्ध विवाह समिती व भीमघाट स्मारक समितीचे पदाधिकारी श्रमदान करीत आहेत. बौद्ध सामूहिक विवाह सुनिश्चित करण्यासाठी विविध समित्यांची आखणी व बांधणी करून निर्धारित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात मंडप, बिछायत, कुलर, पंखे आदींची जबाबदारी श्रमदान समितीवर सोपविण्यात आली असून यात राजू दोनोडे, लक्ष्मीकांत डहाट, श्याम चवरे, भाऊदास डोंगरे, अनुनाथ भिमटे यांचा समावेश आहे. स्टेज, गेट, अस्थिकलश, सजावट, बॅनर, तोरण समितीमध्ये कमलेश वासनिक, कमलेश वैद्य, कपिल नागदेवे, बंटी मेश्राम, सावजी मेश्राम, दीपक वाहणे व इतर मित्रांचा समावेश आहे. पाणी पुरवठा समितीमध्ये डोंगरे, वर्षा, समता सैनिक दल व इतर, वर-वधू देखभाल समितीमध्ये गीता चव्हाण, शील मेश्राम, सुरेंद्र बन्सोड, दीपिका वाहणे, मोठा गोंदिया महिला मंडळ तसेच गोविंदपूर पाटलीपूत्र बुद्ध विहार मंडळ सांभाळणार आहे. भोजन वाढणे व स्वयंपाक समितीमध्ये सिद्धार्थ गणवीर, विजू डोंगरे, कपिल नागदेवे, मंजुश्री बोरकर, एन.टी. बोरकर, नागेश वानखेडे, विजय गजभिये, सुभाष चव्हाण व छोटा गोंदियाचे तरूण सहकार्य करणार आहेत. तक्रार व उपचार समितीमध्ये डॉ.पी.सी. भिमटे, डॉ. गणवीर, डॉ. वैद्य, सुशील ठवरे, भुपेंद्र वैद्य, जयेश बन्सोड, सावंत बोरकर व क्रीडा मंडळ गांधीवार्ड यांचा समावेश आहे.कार्यक्रमासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सुखदेवे, महेंद्र कठाणे व सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सैनिक सहकार्य करीत आहेत.