शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

२४ झाले मुक्त तर २५ बाधितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश असून यात शहीद मिश्रा वार्ड २, सुभाष वार्ड १, डोंगरवाव खडकी १ आणि बिरसी येथील १ बाधिताचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून यामध्ये कुंभारटोली २, बोदा १, किंडगीपार १, आमगाव १ येथील तर सडक अजुर्नी शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५३ वर, १० हजार ८८६ स्वॅब नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने गावकऱ्यांसह प्रशासनाची चिंता वाढविली आहे. बुधवारी (दि.१२) आणखी २५ कोरोना बाधितांची भर पडली तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हावासीयांना धक्का बसला. मात्र २४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश असून यात शहीद मिश्रा वार्ड २, सुभाष वार्ड १, डोंगरवाव खडकी १ आणि बिरसी येथील १ बाधिताचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून यामध्ये कुंभारटोली २, बोदा १, किंडगीपार १, आमगाव १ येथील तर सडक अजुर्नी शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यातील गिरोला येथील १ तसेच गोंदिया तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश असून यामध्ये झिलमिली १, नागरा २, रायपूर १, अदासी तांडा येथील १ आणि गोंदिया शहरातील सिव्हील लाईन २, न्यू लक्ष्मीनगर १, लोहा गार्डन १, दुर्गा चौक १, कुंभारेनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १४, सालेकसा तालुक्यातील १, तिरोडा तालुक्यातील १, आमगाव तालुक्यातील ३, सडक अर्जुनी तालुक्यातील ४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या तीन रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील २ आणि गोंदिया येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.११ हजार ७९० स्वॅब नमुन्यांची तपासणीकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ११ हजार ७९० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७०८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १० हजार ८८६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे.१९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. तर १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४१८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २५३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आता ११० कंटेन्मेंट झोन४जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्येत वाढ होत असून ग्रामीण भागात अधिक प्रादुर्भाव होत आहे. परिणामी कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली असून जिल्ह्यात सध्या स्थितीत ११० कंटेन्मेंट झोन आहेत.