शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१८५२ शेतकर्‍यांची वीज जोडणी प्रलंबित

By admin | Updated: May 30, 2014 23:59 IST

जिल्ह्यात विद्युत भारनियमनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटना मोर्चे काढून विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदने देत आहेत. अशातच मार्च २0१४ च्या

देवानंद शहारे - गोंदियाजिल्ह्यात विद्युत भारनियमनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटना मोर्चे काढून विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदने देत आहेत. अशातच मार्च २0१४ च्या अखेरपर्यंत डिमांड भरूनही जिल्हाभरातील एक हजार ८५२ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे. या विद्युत जोडण्या मार्च २0१५ च्या अखेरपर्यंत करण्यात येतील, असे विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता फूलकर यांनी सांगितले. उल्लेखनिय म्हणजे १ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षभरासाठी विद्युत विभागाला एक हजार ४६५ कृषी पंपांना विद्युत जोडणीसाठी विद्युत विभागाला उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २0१३ च्या अखेरील डिमांड भरलेल्या, तसेच त्या चालू वर्षातील काही शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी करून विद्युत विभागाने उद्दिष्टपूर्ती केली. विशेष म्हणजे त्यावर्षी एकूण एक हजार ७५६ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी करून विद्युत विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिकची पूर्तता केली होती, असे अधीक्षक अभियंता फूलकर यांनी सांगितले. यानंतर १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ पर्यंत जिल्हाभरातील एकूण एक हजार ८५२ शेतकर्‍यांनी कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी विद्युत विभागाला अर्ज केले. विद्युत विभागाचे उद्दिष्टसुद्धा तेवढेच होते. या सर्व शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी विद्युत विभागाला अर्जही केलेले आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांनी डिमांड रक्कमसुद्धा भरल्या आहेत. या सर्व शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी मार्च २0१५ पर्यंंत करण्यात येणार आहे. यात गोंदिया तालुक्यातील १९६, गोरेगाव तालुक्यातील १५८, तिरोडा तालुक्यातील १८८, आमगाव तालुक्यातील २३७, सालेकसा तालुक्यातील १५८, देवरी तालुक्यातील ११४, सडक/अर्जुनी तालुक्यातील ५४३ व मोरगाव/अर्जुनी तालुक्यातील २५८ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडण्या करण्यात येणार आहे.