शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावरील ‘त्या’ १८ कर्मचाऱ्यांची उपासमार

By admin | Updated: April 26, 2016 01:41 IST

तब्बल २० वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर १२-१२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पगार देण्याची मागणी

गोंदिया : तब्बल २० वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर १२-१२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पगार देण्याची मागणी करताच त्यांना एका झटक्यात कामावरून काढून टाकण्याचा प्रकार स्थानिक प्रभात टॉकीजसमोरील भारत पेट्रोलियम पंपावर (नाईस आॅटो सेंटर) घडला. या प्रकाराची तक्रार त्या कर्मचाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधितांकडून दाद न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.आपली व्यथा मांडताना या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून या पेट्रोल पंपावर काम करीत आहेत. त्यांना आता अवघा ४ हजार रुपये महिना वेतन दिले जाते. मात्र रजिस्टरवर सही घेताना तिथे हा आकडा टाकला जात नाही. वास्तविक पेट्रोल कंपनीच्या नियमानुसार किमान वेतन २८१ रुपये प्रतिदिवस असायला पाहीजे. वाढती महागाई पाहता या पंपावरील सर्व १८ कर्मचाऱ्यांनी पंपाचे संचालक पुरूषोत्तम मोदी यांच्याकडे वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यांनी त्यांची काहीही ऐकून न घेता दुसऱ्या दिवशीपासून कामावर येऊ नका असे सांगितले. दुसऱ्या दिवशी हे कर्मचारी गेले असता त्यांना कामावरून काढल्याचे सांगून काम करण्यास मज्जाव केला.सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी यासंदर्भात दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सदर कर्मचारी व पेट्रोल पंपाचे संचालक मोदी यांना बोलविले. मात्र मोदी अनुपस्थित राहीले. आता त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. नियमानुसार केलेल्या मागणीचे हे फळ मिळाल्यामुळे आज आमच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. आम्हाला पूर्ववर कामावर घ्यावे आणि नियमानुसार वेतन, कामाच्या वेळा ठरवून द्याव्या, अशी मागणी भीमराज घोडेस्वार, सुशील सूर्यवंशी, चंद्रपाल भगत, देवेंद्र राणे, राधेश्याम कोरे, दिनेश मानकर, सुनील श्यामकुवर, खेमराज घोडेस्वार, संतोष मेश्राम, राजा गजभिये, पवन बोकडे, शुभम पहिरे, ओमप्रकाश मिसार, राहुल गोंडाने, सिद्धार्थ भालाधरे, कैलास मानकर, रविंद्र बोपचे व गौरी राणे यांनी केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)मी कोणालाही कामावरून काढले नाही. कोणी येत आहे, कोणी नाही येत आहे. दि.५ ला सहायक कामगार आयुक्तांनी मला बोलावले आहे. त्यांच्यासमोर मी आपले म्हणणे मांडेल.- पुरूषोत्तम मोदीसंचालक, मोदी पेट्रोल पंप