शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत १७ औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ उपकेंद्र आहेत. परंतु या आरोग्य संस्थामध्ये १७ प्रकारच्या औषधी नाहीत. औषध भांडारात औषध उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून औषधांची मागणीच होत नसल्याचे औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बहुतांश औषधी उपलब्ध असली तरी १७ प्रकारची औषधी उपलब्ध नसल्याची ओरड जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देगुणवत्ता नियंत्रणामुळे लागतो उशीर : महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा, प्रमाणपत्र न मिळाल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. येथील जनता आरोग्यासंदर्भात उदासिन आहेच. सोबत आरोग्य यंत्रणाही निरूत्साही आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्याच्या आरोग्य संस्थात १७ प्रकारची औषधीच नाही. जिल्हा औषधी वितरण भांडारात लाखो रूपयांच्या औषधी येऊन पडल्या आहेत. परंतु त्या औषधांची गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाकडून औषधी योग्य असून वाटप करा असे पत्र न मिळाल्यामुळे ती औषधी तशीच पडून आहे.गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ उपकेंद्र आहेत. परंतु या आरोग्य संस्थामध्ये १७ प्रकारच्या औषधी नाहीत. औषध भांडारात औषध उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून औषधांची मागणीच होत नसल्याचे औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बहुतांश औषधी उपलब्ध असली तरी १७ प्रकारची औषधी उपलब्ध नसल्याची ओरड जिल्ह्यात आहे.या १७ प्रकारच्या औषधांचा साठा औषध भांडारात उपलब्ध आहे. परंतु त्या औषधांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी नागपूरच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे औषधांचे नमुने पाठविण्यात आले आहे.परंतु तिथून त्या नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रामीण भागात या औषधांचे वाटप करण्यात आले नाही. अ‍ॅन्टीबायोटीक म्हणून वापरली जाणारी सिफलोक्लोक्सासीन, शर्करावर चालणारी ग्लीकाझाईड, ग्लीमीपराईड, उलटीसाठी असलेली डोमपॅरीडॉन, रक्तदाबासाठी असलेली एम्लोडेपीन, अ‍ॅटेनॉल, मेटॅप्रोलाल, क्लोरथॉराडीन, पोटदुखीसाठी असलेली डायसाक्लोमीन, पाणी शुध्द करण्यासाठी असलेली औषधी सोडीयम हायपोक्लोराईन सोल्यूशन, उच्च रक्तदाबासाठी असलेली आॅटोवास्टासिन, दुखण्यासाठी असलेली डायक्लोफीनॅक सोडीयम, पॅरासिटामल, रक्त वाढविण्यासाठी असलेले आयरन सुक्रोज इंजेक्शन व दमासाठी लागणारे सालबुटामोल व इथीओफायलीन ही औषधी औषध भंडारात उपलब्ध असूनही गुणवत्ता नियंत्रण अहवाल आल्याशिवाय वाटप करता येत नाही.३३ लाखाची औषधी पडून, पण वाटप होेईनाप्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात औषधांचा तुटवडा आहे. गुणवत्ता नियंत्रणाचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे १७ प्रकराच्या ह्या औषधी उपलब्ध असूनही वाटता येत नाही. ३३ लाख ३९ हजार ४६५ रूपये १७ पैश्याच्या औषधी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून औषधी ओके असल्याचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे त्या औषधांना जिल्ह्यात वाटता येत नाही.गोरगरिब रुग्णांना आर्थिक फटकाग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये गोरगरीब रुग्णांचा समावेश आहे. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र औषध उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरून औषधी करावी लागत आहे.यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.

टॅग्स :medicinesऔषधं