शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

१४० कॅमेऱ्यांची वाघांवर ‘नजर’

By admin | Updated: April 28, 2015 00:49 IST

नव्याने अस्तित्वात आलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील वाघांना कोणाची ‘नजर’ लागू नये, आणि त्यासाठी

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : जुन्या १०५ कॅमेऱ्यांचे सेंसर झाले खराबदेवानंद शहारे ल्ल गोंदियानव्याने अस्तित्वात आलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील वाघांना कोणाची ‘नजर’ लागू नये, आणि त्यासाठी त्यांच्यावर सतत नजर राहावी यासाठी १४० कॅमेरे २४ तास कार्यरत आहेत. मात्र प्रत्यक्षात हे कॅमेरे अपुरे असून आणखी कॅमेरे मिळविण्यासाठी नियोजन केले जात आहे.नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगाव सिनरी, कोका, नागझिरा व नवीन नागझिरा अभयारण्य मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी मिळाली. शासनाच्या आदेशानुसार वाघांची संख्या कळावी म्हणून उत्कृष्ट अशा १४० कॅमेऱ्यांतून ट्रॅपिंग सुरू करण्यात आली आहे. सध्या तीन ठिकाणच्या ट्रॅपिंग पूर्ण झाल्या असून दोन ठिकाणी बाकी आहेत.मागील तीन वर्षांपासून तेच कॅमेरे ट्रॅपिंगसाठी वापरले जात आहेत. दर तीन वर्षांनी हे कॅमेरे बदलावे लागते. मात्र निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे यंदासुद्धा जुन्याच कॅमेऱ्यांमधून टॅपिंग करणे सुरू आहे. या जुन्या कॅमेऱ्यांपैकी १४० कॅमेरे उत्कृष्ट असल्यामुळे त्यांचाच उपयोग वाघांच्या ट्रॅपिंगसाठी केला जात आहे. सद्यस्थितीत १०५ कॅमेरे नादुरूस्त आहेत. त्यांचे सेंसर पूर्णत: निकामी झाले असून आता ते कोणत्याच उपयोगाचे नाहीत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पूर्ण क्षेत्र ६५६ चौरस किमी आहे. २०० हेक्टरच्या क्षेत्रासाठी दोन जोडी कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. कॅमेरे एका ठिकाणी २० दिवसांसाठी लावले जातात. त्यानंतर तेथून काढून तेच कॅमेरे दुसऱ्या क्षेत्रात लावले जातात. वाघांची खरी संख्या व शास्त्रोक्त माहिती मिळवून घेण्यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. या कॅमेऱ्याद्वारे वाघांच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे व संख्या प्राप्त होते. त्यानंतर ते छायाचित्र वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट आॅफ इंडिया येथे पाठविले जाते. तेथे त्या वाघांना विशिष्ट आयडी दिला जातो. या कॅमेऱ्यांद्वारे नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहितीसुद्धा मिळते. शिवाय जंगलात शिरणारी गावरान कुत्रे, गुरे किंवा मनुष्य यांचीही माहिती मिळते. मात्र हे कॅमेरेसुद्धा चोरी होतात. आतापर्यंत पाच ते सहा कॅमेरे चोरी झाले आहेत. याची तक्रारही पोलिसांत करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. परंतु हे कॅमेरे लोकांसाठी कसल्याही उपयोगाचे नसतात. दरवर्षी फेज-४ प्रगणक वाघांची संख्या काढण्यासाठी केली जाते. सध्या ही कॅमेरा ट्रॅपिंग नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगावबांध सिनरी व कोका अभयारण्य इत्यादी क्षेत्रात करण्यात आली आहे. आता नवीन नागझिरा अभयारण्यात ट्रॅपिंग सुरू आहे. येथे २० दिवस पूर्ण होताच येथील कॅमेरे काढून जुन्या नागझिरा अभयारण्यात कॅमेरे लावून ट्रॅपिंग सुरू केली जाणार आहे. त्यानंतरच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची योग्य संख्या कळणार आहे.कॅमेऱ्यांसाठी चार लाखांचा निधी उपलब्धनवीन कॅमेरे विकत घेण्यासाठी यंदा चार लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जवळपास १५ हजार रूपयांचा एक कॅमेरा असून लवकरच ते खरेदी करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे भारतात बनत नसून विदेशातून मागविले जातात. शिवाय हे कॅमेरे एकदाच उपयोगात येतात. एकदा बिघडले की त्यांची दुरूस्ती केली जावू शकत नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.आठ मोठे वाघ व तीन पिले ट्रॅपनवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगाव सिनरी व कोका अभयारण्य या तीन क्षेत्रात कॅमेऱ्यांतून वाघांची ट्रॅपिंग पूर्ण झालेली आहे. नवीन नागझिऱ्यात सुरू असून त्यानंतर नागझिरा अभयारण्यात करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या ट्रॅपिंगमध्ये आठ मोठे वाघ व तीन पिलू असे एकूण ११ वाघ आढळले आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची पूर्ण ट्रॅपिंग झाल्यावर वाघांची योग्य संख्या कळणार आहे. नागझिरा येथील एक वाघीन नवेगावबांध येथील ट्रॅपिंगमध्ये आढळली आहे. वन्यजीव इतरत्र भटकत असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.