शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळेतील पहिल्या वर्गात १२१९४ ऑनलाईन प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ उपक्रम राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे या शाळांची पटसंख्या वाढली आहे.

ठळक मुद्देपटसंख्या वाढविण्यासाठी जि.प.चा उपक्रम : पालकांना झाली मदत, गुणवत्तेवर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. गुढीपाडवापासून सुरू करण्यात आलेली ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १ मे पासून सुरू करण्यात आली. १२ मे पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीच १२ हजार १९४ प्रवेश निश्चीत झाले आहे.जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ उपक्रम राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे या शाळांची पटसंख्या वाढली आहे. आणखी जि.प. शाळांतील विद्यार्थी संख्या घटू नये यासाठी यंदापासून वर्ग पहिलीत ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत आमगाव तालुक्यात ९६०,सालेकसा ७५८, देवरी १ हजार ११४, सडक-अर्जुनी १ हजार १०९, अर्जुनी-मोरगाव १ हजार २४०, गोरेगाव १ हजार ४१८, तिरोडा १ हजार ८३१ व गोंदिया तालुक्यात ३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, उपस्थिती भत्ता, प्रशिक्षित शिक्षक, हँडवॉश स्टेशन, बालग्रंथालय, वाचन कुटी इत्यादी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याच गावातील नाहीतर बाहेर गावातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घ्यायला येतात. सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांमध्ये होत आहे. जिल्ह्यातील हजारो शिक्षक संगणक प्रशिक्षणामुळे तंत्रस्नेही झाले आहेत. प्रत्येक शाळेत डिजीटल साधन असून त्याचा नियमित वापर करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने (महाराष्ट्र शासन) दिक्षा अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन अभ्यासक्र म शिकविले जाते. यातूनच आता १ मेपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.मे महिना प्रवेशासाठीजि.प.शाळांमध्ये प्रवेश वाढविण्याकरिता दरवर्षी ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून १०० टक्के प्रवेशासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्र माला स्थगिती देण्यात आली आहे. शाळेतील प्रवेश प्रक्रि या १ मेपासून ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण मे महिन्यात ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे.गोंदिया शिक्षण विभागाने लिंक तयार करून ऑनलाईन प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करून प्रवेश निश्चित करून घ्यावा. आपापल्या शाळेत प्रवेश वाढविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा.- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा