शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट

By admin | Updated: April 25, 2017 00:43 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

‘जीडीसीसी’ने केली सुरूवात : गेल्या वर्षीच्या तुलनेत खरिपाचे कर्जवाटप घटणारगोंदिया : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. कर्जवाटपात दरवर्षीच जिल्हा बँक अग्रेसर राहाते. मात्र गेल्या आर्थिक वर्षात कर्जवसुलीचे प्रमाण घटले. त्यामुळे यंदा कर्जवाटपाचे टार्गेट वाढवून घेण्याऐवजी अंशत: कमी करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. धानाचे कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ख्याती असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाचा बेभरोसा हे यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते. आर्थिक सक्षमता नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच कायम असते. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच नाही तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. असे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेची शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता यामुळे जिल्हा बँक अनेक वेळा ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. जिल्हा बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. १ एप्रिलपासून बँकेने कर्जवाटपाला सुरूवात केली असून आतापर्यंत १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू होताच कर्जवाटपाच्या कामाला वेग येणार आहे. (शहर प्रतिनिधी)कर्जवसुलीअभावी टार्गेट कमीमागील वर्षी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १२६.५० कोटींचे कर्जवाटपाचे टार्गेट होते. त्यात ११२.८८ कोटी कर्जवाटप करण्यात आले. मात्र ७१.४९ कोटींचीच कर्जवसुली झाली होती. कर्जवसुलीचे प्रमाण कमी असल्याने बँक ेने यंदा कर्जवाटपाचा जास्त बोझा घेऊन त्यात बाधा येवू नये याकरिता टार्गेट कमी करवून घेतले. यामुळे यंदा बँकेला ११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट देण्यात आले आहे. यंदा घेतलेल्या टार्गेटनुसार बँकेने त्यासाठी व्यवस्था करून घेतली असून कर्जवाटपात अडचण येवू नये यासाठी टार्गेट कमी केल्याचे सांगण्यात आले.२६ कोटी बँकेकडेच पडूननोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जमा झालेले २६ कोटी रूपये अजूनही बँकेकडेच पडून आहेत. एवढी मोठी रक्कम पडून असल्याने साहजिकच आर्थिक परिणाम जाणवतो. मात्र कर्जवाटपावर याचा परिणाम पडू नये यासाठी जिल्हा बँकेने मार्ग काढला आहे. जिल्हा बँक नाबार्डकडून १०० कोटी कर्ज घेणार आहे. यातून बँक मागील कर्जाचे ४० कोटी फेडणार व त्यातून ६० कोटी रूपये शिल्लक राहतील. शिवाय बँकेने केलेल्या कर्जवसुलीतून उर्वरित कर्जवाटपाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळेच २६ कोटींची रक्कम पडून असतानाही बँकेला कर्जवाटपात अडचण फारसी अडचण येणार नसल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.