शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

१०.६४ लाखांची दारू व साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

तिरोडा : ग्रामपंचायत निवडणुकींची मतमाेजणी सोमवारी (दि. १८) होणार असून परिसरात शांतता राहावी या दृष्टीने पोलिसांनी ६ ठिकाणी धाड ...

तिरोडा : ग्रामपंचायत निवडणुकींची मतमाेजणी सोमवारी (दि. १८) होणार असून परिसरात शांतता राहावी या दृष्टीने पोलिसांनी ६ ठिकाणी धाड घालून १० लाख ६४ हजार ६०० रुपयांची दारू तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि. १७) सकाळी ही कारवाई केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संत रविदास वॉर्ड निवासी तरासन अशोक बरियेकर यांच्या घरी धाड घातली असता तेथे हातभट्टीची दारू, साहित्य आणि ९६ प्लास्टिक पोत्यात १,९२० किलो सडवा मोहफूल असा १ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा माल मिळाला. शीला विनोद खरोले यांच्या घरातून हातभट्टीची दारू, साहित्य आणि ७२ प्लास्टिक बॅगमध्ये १,४४७ किलो सडवा मोहफूल असा एकूण १ लाख १५ हजार २०० रुपयांचा माल मिळाला. वनमाला भीमराव झाडे यांच्या घरात हातभट्टीची दारू, साहित्य आणि १०८ प्लास्टिक बॅगमध्ये २,१६० किलो सडवा मोहफूल असा एकूण १ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा माल मिळून आला. श्यामराव श्रीराम झाडे याच्या घरात हातभट्टीची दारू, साहित्य आणि ६४ प्लास्टिक पोत्यात १,२८० किलो सडवा मोहफूल असा एकूण १ लाख १७ हजार ४०० रुपयांचा माल मिळून आला. कलीम गफूर पठाण याच्या घरात हातभट्टीची दारू, साहित्य आणि १६२ प्लास्टिक पोत्यात ३,२४० किलो सडवा मोहफूल असा एकूण २ लाख ५९ हजार २०० रुपयांचा माल मिळून आला. तर साबीर रहीम पठाण याच्या घरी धाड घातली असता हातभट्टीची दारू, साहित्य आणि १५४ प्लास्टिक पोत्यात ३,०८० किलो मोहासडवा अशा २ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा माल असा एकूण १० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा माल मिळून आला. आरोपींविरुद्ध दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.