शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

१००१ दिव्यांची महाआरती

By admin | Updated: October 26, 2015 01:57 IST

नवरात्रीचे औचित्य साधून लोकमत सखी मंच व रास गरबा उत्सव समिती गोविंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गरबा मैदानात १००१ दिव्यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत सखी मंच : २८ आॅक्टोबरला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन गोंदिया : नवरात्रीचे औचित्य साधून लोकमत सखी मंच व रास गरबा उत्सव समिती गोविंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गरबा मैदानात १००१ दिव्यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलाल दर्जा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून सुनील केलनका, नगरसेवक गप्पू गुप्ता, भरत क्षत्रिय, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, किशोर इलानी, शिव शर्मा, संजय मुरकुटे, पप्पू भादुभुते, विजय उके, नगरसेविका भावना कदम उपस्थित होते. याप्रसंगी १००१ दिव्यांच्या आरतीने देवीची महाआरती करण्यात आली. तसेच आरती सजावट स्पर्धा घेण्यात आली. यात अनमोल अग्रवाल प्रथम, आरती राणे द्वितीय तर श्रद्धा मिश्राने तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षकाचे कार्य योगिनी पथ्थे व नेहा साठवणे यांनी सांभाळले. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक संयोजिका दिव्या भगत यांनी मांडले. संचालन दिलीप कोसरे यांनी केले. आभार राकेश लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी कुशल अग्रवाल, चेतानंद लांजेवार, तुलाराम ढबाले, उमेश शहारे, सतीश कनोजिया, राज मिश्रा, हर्ष तिवारी, अशोक भागडकर, संतोष मेश्राम, माधो ठाकरे, दिनेश फरकुंडे, राजेश कावळे, विपुल अग्रवाल, सुरेश ठाकरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)