शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार मुले आधार नोंदणी विनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:41 IST

सर्वांसाठी आधार नोंदणी ही अत्यावश्यक व बंधनकारक असतानाच जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील

६ ते १८ वर्षे वयोगट : विशेष मोहीम राबविण्याची गरजलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांसाठी आधार नोंदणी ही अत्यावश्यक व बंधनकारक असतानाच जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल ९ हजार ८१३ मुले (मुले-मुली) आधार नोंदणी विनाच आहेत. आज प्रत्येकच कामासाठी आधारकार्ड असणे महत्वाचे झाले असून या मुलांकडे आधारकार्ड नाही. यासाठी मात्र आता पुन्हा आधारकार्ड नोंदणीची विशेष मोहिम राबवून त्यांची नोंदणी करण्याची गरज आहे. आज शासकीय किंवा खाजगी कार्यालयातील कोमतेही काम असो आधारकार्ड क्रमांक अगोदर विचारला जातो. तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर त्या आधारेच आज तुमचे काम होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जन्माला आलेल्या चिमुकल्यापासून सर्वांची आधारकार्ड नोंदणी बंधनकारकच करण्यात आली आहे. सुरूवातीला यासाठी शासनाने आधारकार्ड नोंदणीसाठी ठिकठिकाणी शिबिरे लावून नोंदणी करवून घेतली. अशात आतापर्यंत जिल्ह्यातील ९७.३३ नागरिकांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. असे असतानाच मात्र, जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील ९ हजार ८१३ मुले आधारकार्ड नोंदणी विनाच आहेत. ९६.४५ टक्के मुलांची जिल्ह्यात नोंद झालेली आहे. हे वय शिक्षणाचे असते व शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांची गरज पडते. मात्र या मुलांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांना या कामात कोठेतरी अडचण येत असावी यात शंका नाही. करिता या मुलांची आधारकार्ड नोंदणी करण्याची गरज आहे. यासाठी मात्र शासनाने पुन्हा आधारकार्ड नोंदणीसाठी शिबिरे घेण्याचीही तेवढीच गरज आहे. याशिवाय जिल्ह्यातील आधारकार्ड वंचितांची नोंद होणार नाही व जिल्हा पूणपणे आधारकार्ड नोंद झालेला जिल्हा होणार नाही.