शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामांचे १७ कोटी रुपये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींचे महत्त्व अधिक वाढले आहे.मात्र मनरेगांतर्गत विकास कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मागील तीन वर्षांपासून थकीत असल्याने ग्रामपंचायतींचा कणा मोडला आहे.

ठळक मुद्देचारशेवर ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी : प्रशासनाचे वेळकाढू धोरण, सरपंच देणार आयुक्त कार्यालावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांचे १७ कोटी ७३ लाख ३७ हजार रुपयांची देयके मागील तीन वर्षांपासून प्रलबिंत आहे. देयके न मिळाल्याने चारशेवर ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली असून काम करणारे कंत्राटदार सुध्दा अडचणीत आले आहे.मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडीसह इतर कुशल कामे २०१६ ते २०१९ या कालावधीत अनेक कामे करण्यात आली.यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचा सुध्दा समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे पूर्ण केली.या कामांमुळे हजारो मजुरांच्या हाताला कामे सुध्दा उपलब्ध झाले. शिवाय शासनाकडून सुध्दा या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याचे श्रेय घेण्याची संधी सुध्दा सोडली नाही. मात्र कुशल कामे करुन सुध्दा मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील ५४८ ग्रामपंचायतपैकी चारशेवर ग्रामपंचायतींना कामाचे पैसे मिळाले नाही.मागील तीन वर्षांपासून मनरेगाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे १७ कोटी ७३ लाख ३७ हजार रुपये थकीत आहेत.यामुळे ग्रामपंचायत आणि काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेची सुध्दा आर्थिक कोंडी झाली आहे.विकास कामांसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपल्या जवाबदारीवर उधारीवर साहित्य खरेदी केले. मात्र मनरेगाकडून निधी न मिळाल्याने त्यांची सुध्दा चांगलीच कोंडी झाली आहे.देणेदार त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावत आहे.त्यामुळे सरपंचानी यासाठी पालकमंत्री, सीईओपासून सर्वच अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.जिल्ह्यातील गोंदिया तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायत मनरेगाच्या थकीत निधीमुळे अडचणीत आल्या आहेत.मनरेगा आयुक्तांना विचारणार जाबग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींचे महत्त्व अधिक वाढले आहे.मात्र मनरेगांतर्गत विकास कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मागील तीन वर्षांपासून थकीत असल्याने ग्रामपंचायतींचा कणा मोडला आहे. त्यामुळे थकीत निधी कधी देणार याचा जाब मनरेगा आयुक्तांना विचारण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच शुक्रवारी (दि.२०) जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्त्वात नागपूर येथे धडक देणार आहेत.