शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महिला आंदोलकांच्या घरी जाऊन मानसिक छळ

By admin | Updated: March 13, 2015 00:54 IST

पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा

पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या जीव्हीकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुरुवारी डिचोली व पेडणे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या या प्रकारावर सरकारने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली. जीव्हीके व्यवस्थापन सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये फूट घालण्याचे प्रयत्न करत आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित पत्रे पाठविली. काहींना घरी जाऊन धमक्या दिल्या. महाराष्ट्रातील महिला कर्मचाऱ्यांनाही फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या. मात्र, कर्मचारी एकोपा सोडत नसल्याने व आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता महिला कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देणे व त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनांच्या कर्मचाऱ्यांकडून होऊ लागला आहे, असे संघटनेचे सचिव सागर प्रभुदेसाई यांनी सांगितले. याबाबत डिचोली येथील १0८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या सोनाली शिरोडकर यांना जीव्हीकेचे कर्मचारी सूरज नाईक व रफीक यांनी घरी जाऊन त्रास दिला. शिरोडकर यांना आंदोलनात सहभागी न होता पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी ते आग्रह करीत होते. नाईक व रफीक ज्या वेळी शिरोडकर यांच्या घरी गेले होते, तेव्हा घरात कुणी नसल्याने शिरोडकर यांनी शांतपणे सगळे ऐकून विचार करून सांगते, असे सांगून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तसेच पेडणे येथील रुग्णवाहिका कर्मचारी प्रमिला पेडणेकर यांच्या घरी जाऊन त्यांनाही धमकी देण्यात आली. सूरज नाईक व रफीक हे ज्या वेळी प्रमिला यांच्या घरी पोहोचले तेव्हा घरात प्रमिला व तिची आठ वर्षांची मुलगी होती. प्रमिलालाही आंदोलनात सहभागी असल्याने मानसिक त्रास देण्यात आला. त्यानंतर प्रमिला यांनी नाईक व रफीक यांच्याविरोधात पेडणे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, येथे आंदोलनाला बसणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही आता व्यवस्थापनाकडून होत असलेल्या त्रासाबाबत भीती वाटू लागली आहे. आंदोलनकर्ते राज्यातील विविध गावांतून ये-जा करत असताना त्यांच्या जीवाला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न ते विचारत आहेत. सरकारने या विषयावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असून पुढील तीन दिवसांत या विषयावर तोडगा काढण्यात येत नसेल तर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. (प्रतिनिधी)