When administration take action against industrial estate hotspot for corona | "कोरोना हॉटस्पॉट्स बनलेल्या औद्योगिक वसाहतीवर प्रशासन केव्हा कारवाई करणार?"

"कोरोना हॉटस्पॉट्स बनलेल्या औद्योगिक वसाहतीवर प्रशासन केव्हा कारवाई करणार?"

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यात आता झोपडपट्ट्या पाठोपाठ औद्योगिक वसाहती कोरोनाचे हॉटस्पॉट्स बनत असून वेर्णा पाठोपाठ आता कुंकळी औद्योगिक वसाहतीतही पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीतून गोव्याच्या विविध भागात ही साथ पसरली असूनही जिल्हा प्रशासनाने अजूनही हवी तशी पाऊले उचललेली नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. कोरोना फैलावणाऱ्या वासहतीसंदर्भात जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करणार का? हा सवाल आता लोक विचारू लागले आहेत. 

वेर्णायेथे ट्युलीप डायग्नोस्टीक या एकाच कंपनीत 40 कामगार पॉझिटिव्ह आढळल्याने हा कारखाना बंद करण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला असून कुंकळी औद्योगिक वसाहतीत 12 रुग्ण आढळून आल्याने गोवा इस्पात आणि इंडो स्पिरीट बेव्हरेजिस हे दोन कारखाने बंद केले आहेत.

वेरणा येथील फार्मा उद्योगातून सगळीकडे हा प्रसार होऊ लागला आहे. सध्या रासई येथे जो उद्रेक झाला आहे त्याचे मूळ ही औद्योगिक वसाहतच असून बाळली, कुंकळी, कुडचडे , कणकोण एव्हढेच नव्हे तर म्हापसा, मांडुर आणि नेवरा पर्यंत हा प्रसार पोहोचला आहे. कुंकळी औद्योगिक वासहतीतूनही असाच प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्युलीप पाठोपाठ आता सिपला कंपनीतून फैलाव होत असून बेतकी खांडोळा येथे जे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले त्यामागे सिपला कंपनीचे बाधीत कामगार असल्याचे सांगितले जाते.

गोवा लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी या प्रसारबद्दल चिंता व्यक्त करताना , ज्या कारखान्यात हे रुग्ण आढळून आले त्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही काही न काळविल्यामुळेच स्थिती हाताबाहेर गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, जर वेळीच कारखाना बंद केला असता तर हा विस्तार थांबला असता असे ते म्हणाले. ते म्हणाले, डिचोली येथील एका कारखान्यात एक रुग्ण आढळून आल्यानंतर तिथे लगेच काम बंद करण्यात आले. त्यामुळे वेळीच स्थिती नियंत्रणात आली. वेरणातही तसे करता आले असते.

मिळालेल्या माहितीनुसार फक्त ट्युलीपमध्येच नव्हे तर अन्य काही कारखान्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत पण ही माहिती दडवली गेली आहे. वेरणाशी निगडित आतापर्यंत किमान 50 पॉझिटिव्ह केसेस मिळाल्या असून तपासणीचे सर्व अहवाल आल्यानंतर हा आकडा शंभरावर जाऊ शकतो.

वेरणा औद्योगिक वसाहतीत मांगोर हिलमधून कोरोना पसरला. मग वेरणाहून इतर ठिकाणीही प्रसार झाला. ज्या रासई गावात 26 रुग्ण आढळून आले त्या वाड्यावरील दोघेजण फार्मा कंपनीत काम करत असताना त्यांना लागण झाली. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य नंतर बाधित झाले. उत्तर गोव्यात नेवरा आणि मांडुर येथेही वेरणा औद्योगिक वासहतीत काम करणाऱ्या दोघांना लागण झाली होती  त्यानंतर या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या 16 पर्यंत पोहचली.

कुंकळीतही अशीच स्थिती असून सुरवातीला या औद्योगिक वसाहतीत 4 रुग्ण आढळून आले होते आता हे प्रमाण 12 वर पोहोचले आहे. यातील कित्येक कामगार गावात भाड्याच्या खोल्यामध्ये राहत असल्याने गावातही कोरोना फैलावण्याची भीती आहे. कुंकळीचे नगरसेवक शशांक देसाई यांनी या संपूर्ण वसाहतीतील कामगारांची तपासणी करण्याची मागणी केली . ते म्हणाले,  या वसाहतीतील माहिती दडवून ठेवली जात आहे. या वसाहतीत 2000 च्या सुमारास स्थलांतरित कामगार कामाला असून हल्लीच बाहेरच्या राज्यातून काही कामगार आल्यामुळे लोकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"

CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन

 

 

Web Title: When administration take action against industrial estate hotspot for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.