शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘विक्रमादित्य’चे मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण

By admin | Updated: June 15, 2014 01:22 IST

अनिल चोडणकर ल्ल वास्को पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली.

अनिल चोडणकर ल्ल वास्को पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. नंतर पंतप्रधानांनी या युद्धनौकेतून सफर करून त्यावरील युद्धसज्जतेची माहिती घेतली. खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्याने नौदलाचे मनोधैर्य खचितच उंचावले गेले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्यावर त्यांनी भर दिला. सेनादलांमध्ये ‘एक रँक, एक पेन्शन’ योजना राबविण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या युद्धवीरांचा यथोचित गौरव करण्यासाठी व त्यांच्यापासून सर्वांना स्फूर्ती मिळावी यासाठी एक भव्य ‘युद्ध स्मारक’ (वॉर मेमोरियल) उभारण्याचीही मोदी यांनी माहिती घेतली. नवी दिल्लीहून भारतीय वायुसेनेच्या राजहंस या विमानाने आलेल्या मोदी यांचे दाबोळी येथील आय़एऩएस. हंसा नौदल तळावर हार्दिक स्वागत करण्यात आले़ त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री इंद्रजित सिंग राव होते. क्रीम रंगाचा कुर्ता आणि निळे जाकीट परिधान केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ९़४५ वाजता भारतीय वायुसेनेच्या विमानातून उतरले असता नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आऱ के.धवन आणि पश्चिम विभाग नौदल ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी त्यांचे स्वागत केले़ त्यानंतर गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह इतरांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यानंतर त्यांना नौदलाच्या पथकांनी मानवंदना दिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या परिषद सभागृहात अल्पोपहार घेतला. तसेच थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून आय़एऩएस़ विक्रमादित्य या विमानवाहू युध्दनौकेवर ते रवाना झाले़ या वेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री पर्रीकरही विक्रमादित्य युध्दनौकेवर गेले़ विक्रमादित्य विमानवाहू युध्दनौका राष्ट्राला समर्पण करण्याचा सोहळा आय़एऩएस़ हंसा या युध्दनौकेवर आयोजिला होता. दाबोळीच्या आय़एऩएस़ हंसा तळावर केवळ स्वागताचा आणि नौदलाच्या मानवंदनेनंतरचे भाषणही नव्हते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांचा देशातील हा पहिलाच दौरा. या वेळी कडक सुरक्षा होती़