शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जीसीएच्या कारभाराचे न्यायालयाकडून वाभाडे

By admin | Updated: June 25, 2015 01:07 IST

पणजी : मतदान हा मूलभूत हक्क आहे, याचे भान जीसीएला आहे काय? हा हक्क अशा मनमानी पद्धतीने हिरावून घेता येतो काय, अशा प्रश्नांची सरबत्ती करून

पणजी : मतदान हा मूलभूत हक्क आहे, याचे भान जीसीएला आहे काय? हा हक्क अशा मनमानी पद्धतीने हिरावून घेता येतो काय, अशा प्रश्नांची सरबत्ती करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जीसीएच्या कारभारावर ताशेरे ओढले. या प्रकरणात न्यायालय गुरुवारी निवाडा देणार आहे.जीसीए प्रकरणातील सुनावणीवेळी खंडपीठाने जीसीएच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. मतदानासंबंधीची नामांकने उशिरा पाठविल्यामुळे नियमांवर बोट ठेवून ६४ क्लबांना मतदानास मज्जाव करण्याचा निर्णय जीसीएकडून घेण्यात आला, तर ज्यांनी नामांकनेच पाठविली नव्हती, अशा क्लबांना जीसीएने मुदत वाढवून कशी दिली आणि मतदानाचे हक्क कसे दिले? मतदानाचे हक्क का दिले, असे प्रश्न न्या. एफ. एम. रेईश यांनी जीसीएची बाजू मांडणारे अ‍ॅड. दिवाण यांना केला. या प्रश्नावर ते निरुत्तर झाले आणि ती चूक होती, हे त्यांनी मान्य केले. या मुद्द्यावर जीसीएची दुटप्पी भूमिका उघड झाली. मतदान हा मूलभूत हक्क असून १०४ पैकी ६४ सदस्यांचा मतदान हक्क हिरावून घेऊन निवडणुका घेणे, ही लोकशाही पद्धत नसल्याचे न्यायालयाने जीसीएला सुनावले.दरम्यान, बुधवारी खंडपीठासमोर या प्रकरणात सुनावणी सुरू झाली तेव्हा उभय पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आले. जीसीएत सध्या अध्यक्षांची एकाधिकारशाही चालू असून घटनाबाह्य निर्णय घेतले जात असल्याचा दावा क्लबचे प्रतिनिधित्व करणारे अ‍ॅड. सुबोध कंटक यांनी केला. दोन तृतियांशहून अधिक सदस्य क्लब हे जीसीएच्या विरोधात असून अध्यक्षांकडे बहुमत नसल्याचेही त्यांनी सांगितले.कंटक यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना जीसीएचे वकील श्याम दिवाण यांनी, जीसीएकडून ज्या क्लबांना मतदानाचे अधिकार नाकारले ते नियमाला अनुसरूनच असल्याचा दावा केला. २० मे व २९ मे रोजी आलेल्या क्लबच्या नामांकन याद्या स्वीकारण्यात आल्या होत्या. ज्यात चेतन देसाई यांनी पुरस्कृत केलेल्या क्लबचा समावेश होता, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)