शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लुटारूंना अटक

By admin | Updated: May 31, 2014 01:36 IST

मडगाव : संपूर्ण गोव्यात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना दक्षिण गोव्यात वाटमारी करणार्‍या तसेच पर्यटकांना व प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मडगाव : संपूर्ण गोव्यात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना दक्षिण गोव्यात वाटमारी करणार्‍या तसेच पर्यटकांना व प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एक चोरटा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या फरार साथीदाराच्या शोधातही पोलीस आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकरणांत या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती द. गोव्याचे पोलीस अधीक्षक विजय सिंग यांनी दिली. पकडण्यात आलेले तिघेही चोरटे बिगर गोमंतकीय असून यापैकी सद्दाम खुदनावर याला मडगाव पोलिसांनी, ज्ञानेश्वर नाईक याला कोलवा पोलिसांनी तर मारुती गायकवाड याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्या प्रकरणात सद्दाम खुदनावर व त्याचा फरार साथीदार अन्वर शेख यांनी घोगळ हाउसिंग बोर्ड येथील महमद खुर्शीद शेख (३२) या टेलरला आपल्या मोटरसायकलवरून लिफ्ट देऊन रामनगरीच्या डोंगराळ भागात नेऊन लुटले होते. या चोरट्याच्या केलेल्या वर्णनावरून घोगळ हाउसिंग बोर्ड येथे राहाणारा खुदनावर (२३) या संशयिताला पोेलिसांनी ताब्यात घेतले. यापूर्वी आणखी दोन घरफोड्यांमध्ये त्याचा हात असल्याचे तपासात पुढे आल्याचे सिंग यांनी सांगितले. दुसरा साथीदार अन्वर शेख हा फरार असून आतापर्यंत अन्वरचा घरफोड्या व इतर प्रकारच्या एकूण दहा गुन्ह्यांत हात असल्याचे उघडकीस आले आहे. मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, हवालदार सुभाष नाईक, विकास कौशिक तसेच पोलीस शिपाई गोरखनाथ गावस व शम्मीर नगनुरी यांनी कारवाई केली. दुसरी घटना २६ मे रोजी बाणावली येथे घडली होती. सायंकाळी ६.३0 वाजता बाणावलीच्या कोकनट हट येथे राहाणारा जोनाथन सेच्युयर हा आॅस्ट्रियाचा पर्यटक आपली मैत्रीण अ‍ॅना मारिया ब्रेनर हिच्यासह सायकलने माजोर्ड्याहून बाणावलीला येत होता. यावेळी ज्ञानेश्वर नाईक (२0) या मूळ हुबळीच्या तरुणाने मोटरसायकलने त्याचा पाठलाग करून त्याच्या हातातील बॅग पळविली होती. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. हा हडफडे-बार्देस येथे राहात होता व गाड्या धुण्याच्या कामासाठी तो रोज बाणावली भागात यायचा. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोलवा, माजोर्डा, बेताळभाटी व बाणावली या भागात पर्यटकांच्या बॅगा लंपास केल्याचे त्याने कबूल केले. मात्र, या चोर्‍यांची नोंद कोलवा पोलिसांत झाली नव्हती. या आरोपीच्या खोलीवर पोलिसांनी छापा मारला असता, तेथे क्रॉस असलेली सोन्याची चेन, एक सोन्याचे नाणे व पोर्टेबल डिव्हीडी प्लेयर, दोन घड्याळे असा ऐवज सापडल्याची माहिती सिंग यांनी दिली. सध्या या चोरट्याला सहा दिवसांचा पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे. तिसरी घटना २९ मे रोजी कोकण रेल्वे स्थानकावर घडली. मूळ हुबळी येथील मारुती गायकवाड हा चोरटा एका प्रवाशाचे पाकीट मारून पळत असताना स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या संशयिताचे अन्य दोन साथीदार नरेश कुमार व विनोद हे दोघे फरार असून याच दिवशी आणखी एका प्रवाशाचे ६५ हजार रुपये लंपास केले होते. हे पैसे या दोघा चोरट्यांनीच चोरले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. हे तिघेही धारवाडहून गाडीने गोव्यात आले होते, अशी माहितीही पोलिसांना प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)