शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन नगरीत रोज एक आत्महत्या

By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST

पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते.

पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते. राज्यात प्रत्येक आठवड्याला साधारण ५.६१ लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीन वर्षांत ८७७ लोकांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली आहे. यात सरकारी नोकरी न मिळणे, तणाव, मानसिक अस्वस्थता, प्रेम प्रकरणात अपयश, मानसिक, शारीरिक त्रास इत्यादी कारणांचा समावेश आहे. गोवा राज्य भारतातील सर्वात लहान राज्य असले तरी आत्महत्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या लोकसंख्येप्रमाणे देशात २0१२ सालच्या अहवालाप्रमाणे एका लाखाच्या आकडेवारीनुसार ११.७ टक्के आत्महत्यांचे प्रमाण आहे. मात्र, गोव्यात १८.४ टक्के आढळते. येथील दामोदर महाविद्यालयाचे नामदेव गावस व सतीश सावळ यांनी केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील आर्थिक परिस्थिती, मानसिक ताणतणाव, पर्यावरणीय व एकंदर आरोग्य साधनसुविधा हे आत्महत्या करण्यासाठी मानवी मनाला प्रवृत्त करतात. मानसिक कमकुुवतपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, असाही निकर्ष आहे. १६ वर्षांवरील वयोगटात ८७७ पैकी ३३८ व्यक्तींनी केवळ मानसिक तणावामुळे आत्महत्या केली असल्याचे आढळते. २0११ ते २0१३ दरम्यान ६३ व्यक्तींनी दारूच्या अतिरिक्त व्यसनापायी आत्महत्या केली असल्याचे आढळते. दारूचे व्यसन हेही आत्महत्येचे कारण म्हणून पुढे येऊ लागले आहे. कामाच्या ठिकाणी सतावणूक होत असल्यानेही काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी दशेत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने किंवा अभ्यासाच्या भीतीने लहान वयात आत्महत्येचे पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही आहे. अभ्यासाची भीती आणि तणावामुळे मानसिकरीत्या खचत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशकाची आवश्यकता आहे. शिक्षण खात्याने प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक केली आहे. वर्षाला साधारण १५ हजार ४४७ विद्यार्थी या केंद्राकडे येतात. यातील १ हजार ३१७ विद्यार्थी भावनिक समस्यांत अडकलेले असल्याचे आढळते. ९४३ विद्यार्थी नातेसंबंधाच्या समस्यांत, तर २0३ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे समोर आले आहे. समुपदेशकांच्या सहवासात आलेल्या ५६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर २0३ विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास गमावल्याचे जाणवते. चांगल्या करिअरसाठी जास्त अभ्यास जास्त गुण मिळविण्याच्या दडपणाखाली, तणावाखाली विद्यार्थी अनेक वाईट मार्ग जवळ करतात. यात दारू, ड्रग्स, तंबाखू, सिगारेट सारखे पर्याय वापरतात. (प्रतिनिधी)