पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला

By Admin | Updated: June 20, 2014 02:42 IST2014-06-20T02:41:46+5:302014-06-20T02:42:53+5:30

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथील नंदा हरमलकर यांच्या मुलीने घर फोडून घरातील दागिने व रोकड मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला होता.

The stomach threw the thieves and threw stones at the jewelery | पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला

पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथील नंदा हरमलकर यांच्या मुलीने घर फोडून घरातील दागिने व रोकड मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिल्पा हरमलकर (२४) या युवतीला अटक करून मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. १४ रोजी नंदा हरमलकर या सकाळी साडेदहा वाजता आपल्या मुलीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या. जाताना घराची चावी व्हरांड्यातील चपलांच्या रॅकमध्ये ठेवली होती.
नंदा हरमलकर या दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी आल्या असता दरवाजाला चावी लागलेली असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील दोन्ही कपाटे उघडी दिसली.
कपाटातील दोन तोडे, पाच बांगड्या, एक मणी, दोन अंगठ्या व पंधरा हजार रुपयांची रोकड मिळून चार लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती.
म्हापसा पोलिसांनी गुरुवारी शिल्पाला अटक केली. तिने येथील एका पतसंस्थेमध्ये गहाण ठेवलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले. तिने हे दागिने गहाण ठेवून १ लाख ५० हजार रुपयांची रोकड काढल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: The stomach threw the thieves and threw stones at the jewelery