शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पब, बिकिनीवर निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 3, 2014 01:18 IST

पणजी : राज्यात सरकार नव्याने पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणार नाही. पब संस्कृतीवर किंवा बिकिनींच्या वापरावरही निर्बंध नाहीत. फक्त समुद्रकिनाऱ्यांवर

पणजी : राज्यात सरकार नव्याने पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणार नाही. पब संस्कृतीवर किंवा बिकिनींच्या वापरावरही निर्बंध नाहीत. फक्त समुद्रकिनाऱ्यांवर व अन्य सार्वजनिक ठिकाणी कुणाला दारू पिता येणार नाही. त्यासाठीच्या बंदीची प्रभावीपणे अबकारी खाते अंमलबजावणी करील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे जे काही बोलले आहेत, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. प्रत्येकास मत स्वातंत्र्य आहे. मात्र, ढवळीकर यांचे मत प्रत्येक प्रसारमाध्यमांत वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला व ऐकायला मिळते. मला मंत्री ढवळीकर भेटले व त्यांनी जे काही सांगितले, ते मला आक्षेपार्ह वाटत नाही. राज्यात सध्या पर्यटकांची वेषभूषा किंवा पब संस्कृती ज्या प्रकारे सुरू आहे, त्यास सरकारचा आक्षेप नाही. सरकारने आपली भूमिका बदललेली नाही. पबच्या बाहेर येऊन मात्र कुणी दारू पिऊ नये. किनाऱ्यांवरही बसून कुणाला दारू पिता येणार नाही. अबकारी खात्याला आपण पथके स्थापन करून अशा प्रकारांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच खुल्या जागेवर काहीजण दारू पिण्यास बसतात आणि बाटल्या तिथेच टाकून जातात. मुख्यमंत्री म्हणाले की, मद्यालयात जर कुणी दारू पिताना भांडले, तर बारमालकाला जबाबदार धरता येते. त्याबाबत मद्यालयाचा परवानाही निलंबित करता येतो. मात्र, पबमध्ये जाणाऱ्यांनी बाहेर उघड्यावर कुठे दारू पिऊ नये. किनाऱ्यांवरही मद्यप्राशन करू नये. पर्यटकांनी बिकिनी घालून पोहण्यासाठी जाण्यास आक्षेप घेता येणार नाही. पर्यटकांनी कोणती वेशभूषा करावी, हे सरकार सांगू शकणार नाही. मंदिरात किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कोणत्या वेशभूषेत जावे, हे प्रत्येकाने ठरवायचे असते. पर्यटक हाफ पॅन्ट घालून सर्वत्र फिरले म्हणून त्यासही आक्षेप घेता येणार नाही. (खास प्रतिनिधी)