श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीची हत्या

By Admin | Updated: June 29, 2015 02:02 IST2015-06-29T02:02:21+5:302015-06-29T02:02:21+5:30

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीचा रविवारी पहाटे सांपेद्र (जुने गोवा) येथे तिच्या घरात गळा दाबून खून करण्यात आला.

Shripad Naik's assassination murder | श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीची हत्या

श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीची हत्या

तिसवाडी (गोवा) : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीचा रविवारी पहाटे सांपेद्र (जुने गोवा) येथे तिच्या घरात गळा दाबून खून करण्यात आला. चारू राथोड (४८) असे तिचे नाव असून ती नाईक यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर एका झोपडीत राहत होती.
रविवारी पहाटे ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राथोड यांचा गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत. रामण्णा (५०) नावाच्या व्यक्तीने आपल्या आईचा खून केल्याचा दावा राथोड यांचा मुलाने केला आहे.

Web Title: Shripad Naik's assassination murder