शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

श्रीपाद यांनी पत्करली पक्षासमोर शरणागती

By admin | Published: December 29, 2016 2:01 AM

पणजी : पांडुरंग मडकईकर यांच्याबाबतीत मला काहीच न सांगता त्यांना पक्षात घेण्यात आले; ही पक्षाची चूकच आहे, असे पुन्हा

पणजी : पांडुरंग मडकईकर यांच्याबाबतीत मला काहीच न सांगता त्यांना पक्षात घेण्यात आले; ही पक्षाची चूकच आहे, असे पुन्हा एकवार सांगणारे केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी पक्षाची इच्छा शिरसावंद्य असल्याचे त्याच दमात सांगत शरणागती पत्करली आहे. मडकईकर यांच्या पक्षप्रवेशामुळे नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांच्या उमेदवारीवर पाणी फेरले गेले. आपल्याला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला असे सांगून त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली खरी; पण हा सूर संयत ठेवण्याकडेच त्यांचा कल दिसला. आपण किंवा मुलगा सिद्धेश नाराज असलो तरी पक्षाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत त्यांनी नाराजी ही पेल्यातले वादळ ठरल्याचे संकेत स्पष्टपणे दिले. आपण नेहमीच पक्षहिताला प्राधान्य दिले असून आताही पक्षांतर वा पक्षविरोधी कारवायांनी विद्रोह करणे शक्य नाही असे त्यांनी सांगितले. डिजी धन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आयनॉक्स परिसरात आले असता पत्रकारांनी त्यांना या वादासंदर्भात छेडले. मडकईकर यांच्या प्रवेशास नाईक यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक कुंभारजुवे मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून गणले जात होते. त्यासाठी कुंभारजुवे मतदारसंघात गेली साडेचार वर्षे त्यांनी काम केले होते. या मतदारसंघात कधी नव्हे ते भाजपचे मंडळ त्यांच्याकडून उभे करण्यात आले होते व ते अत्यंत सक्रिय होते. मडकईकर यांच्या प्रवेशानंतर दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी सिद्धेश यांच्या घरी धाव घेतली होती व त्यांना पक्षाच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याचा आग्रह केला होता. या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्यासाठीही गळ घातली होती.