शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १३ वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 22:48 IST

Goa : संगमेश याची संध्याकाळी ४ वाजता ‘ऑनलाईन’ गणित विषयाची परिक्षा होती व तो परिक्षेसाठी अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे मुरगाव पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वास्को: दक्षिण गोव्यातील जेटी, सडा येथे राहणा-या संगमेश रायप्पा वरगलदिन्नी नावाच्या १३ वर्षीय मुलाने सोमवारी (दि.१९) संध्याकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. संगमेश याची संध्याकाळी ४ वाजता ‘ऑनलाईन’ गणित विषयाची परिक्षा होती व तो परिक्षेसाठी अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे मुरगाव पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, संध्याकाळी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. ८ वी इयत्तेत शिकणा-या संगमेशची संध्याकाळी ४ वाजता परीक्षा होती. परीक्षेचा अभ्यास न करता तो खेळत असल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने रागाच्या भरात खोलीत जाऊन त्यांने दरवाजा आतून बंद केला. बराचवेळ संगमेश दरवाजा उघडत नसल्याने आई व भावा बहिणींनी दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली, मात्र आतून आवाज येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता संगमेशने दुपट्याच्या मदतीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरित संगमेशला खाली उतरवून उपचारासाठी त्वरित त्याला चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात घेऊन गेले, मात्र येथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

संगमेशच्या हितासाठीच त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने अशा प्रकारचे पाऊल उचलल्याने त्याच्या शेजा-यात व परिसरात एक प्रकारचे धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश याला अन्य सहा भावंडे असून यापैंकी तीन बहिणी व तीन भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही काळापूर्वी संगमेशच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:ख्खाचे सावट असतानाच आता संगमेशने आत्महत्या केल्याने त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुरगाव पोलिसांनी संगमेशच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. मंगळवारी त्याच्यावर शवचिकित्सा करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सजित पिल्ले अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Suicideआत्महत्याgoaगोवा