शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शॅकवाटप आणखी लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:14 IST

९० टक्के शॅक ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभवींना राखीव; हायकोर्टाचा आदेश 

पणजी : ९0 टक्के शॅक ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभवींना राखीव ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. उर्वरित १0 टक्के शॅक तीन वर्षांपेक्षा कमी अनुभवींना मिळतील. २0१९-२२ च्या शॅक धोरणात कोर्टाने काही बदल सूचविले आहेत. त्यामुळे आता सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागणार असल्याने शॅकवांटप आणखी लांबणार आहे.  काही युवकांनी एकत्र येऊन हायकोर्टात याचिका सादर केली होती. तीत त्यांनी या व्यवसायात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना केवळ १० टक्के कोटा ठेवला आहे तो अत्यल्प आहे आणि स्वयंरोजगारासाठी पुढे येऊ इच्छिणाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. आधीच नोकऱ्या मिळत नाहीत, त्यात भर म्हणून स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना निरुत्साही बनविले जात आहे, अशी खंत या युवकांनी याचिकेत व्यक्त केली होती. 

दरम्यान, राज्यात पर्यटक हंगाम ४ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला आहे. रशियाचे पहिले चार्टर विमान ४ रोजी दाखल झाले. तरीही अजून किनाऱ्यांवर शॅक उभे राहू शकलेले नाहीत. शॅकवाटपास होणाऱ्या विलंबामुळे पर्यटन उद्योगाला फटका बसला आहे. 

शॅक धोरणानुसार पुढील तीन वर्षांसाठी यंदा ३४६ शॅकचे वांटप होणार आहे. उत्तर गोव्यात २३८ तर दक्षिण गोव्यात १0८ शॅकचे वाटप होणार आहे. सरकारच्या धोरणानुसार ५0 टक्के शॅक १० वर्षांपेक्षा जास्त अनुभवींना, ४० टक्के शॅक ५ ते ९ वर्षे अनुभवींना तर उर्वरित १0 टक्के शॅक ५ वर्षांपेक्षा कमी अनुभवींना देण्याचे ठरले होते. हायकोर्टाच्या वरील आदेशानंतर आता सरकार या प्रश्नावर काय भूमिका घेते पहावे लागेल.  

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन