शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, तुझे सलाम!

By admin | Updated: July 8, 2014 01:20 IST

पणजी : गोव्यात सहृदय माणसांची आणि दात्यांची वानवा नाही. वेळ येताच दुरितांचे तिमिर दूर करण्यासाठी हजारो हात येथे सरसावतात.

पणजी : गोव्यात सहृदय माणसांची आणि दात्यांची वानवा नाही. वेळ येताच दुरितांचे तिमिर दूर करण्यासाठी हजारो हात येथे सरसावतात. अनेक इतिहासदत्त घटना याला साक्ष आहेत. याच सहृदय दातृत्वाचा प्रत्यय ‘लोकमत’ला आज आला. काणकोण तालुक्यातल्या एका गरीब मच्छीमार कुटुंबातल्या शुभम पागीचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले. परिस्थितीचे चटके सहन करत; पण निर्धाराने त्याच परिस्थितीवर मात करत बिट्स पिलानीच्या राजस्थानस्थित केंद्रात प्रवेश मिळण्याची किमया साध्य केलेल्या शुभमची धडपड प्रसिद्ध करताना या गुणी आणि धडपड्या मुलाचा पुढचा मार्ग सुकर व्हावा हीच मनीषा होती आणि ही मनीषा अवघ्या दोन दिवसांत सुफळ झाली. दुसरा दिवस उजाडला तोच ‘लोकमत’च्या संपादकांना आलेल्या असंख्य फोनसह. शुभमची चौकशी करणारे, त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करत त्याला मदतीचा हात देण्याचे अभिवचन देणारे हे फोन अव्याहतपणे येतच राहिले. गोव्याचा हा गुणी मुलगा शिक्षणापासून वंचित राहाणार नाही याची नि:संदिग्ध ग्वाही देत त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची ग्वाही देणारे हे फोन घेताना गोव्याच्या अंत:करणात वसणारी मायेची ऊब जाणवली नाही तरच नवल! जसजसा दात्यांचा संपर्क वाढला तसा ‘लोकमत’ने एक निर्णय घेतला. या प्रकरणात केवळ एक संवाहकाची भूमिका बजावण्याचा. गोव्यात वसणारी माणुसकी आणि शुभमसारख्या जिद्दी विद्यार्थ्यामधल्या सौहार्दाचे संवाहक होताना ‘लोकमत’ने शुभम पागी आणि त्याचे वडील रामदास यांना पणजी कार्यालयात पाचारण केले. शुभमच्या पुढच्या वाटचालीस साहाय्य करण्याचे, अगदी राजस्थान येथील त्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठीशी राहाण्याचे वचन देणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही दात्यांनाही निमंत्रित केले. या वेळी एका छोटेखानी सोहळ्यात शुभमच्या जिद्दीचे कौतुक केले आणि त्याच्या हितैषींशी त्याची गाठ घालून दिली. शुभमचे आई-वडील आणि आपल्या हातून होणाऱ्या समाजकार्याचा किंचितही बभ्रा होऊ नये, अशी अट घालणारे हितैषी यांचा परिचय घडवत ‘लोकमत’ने अशाच अनामिक दात्यांनी दिलेली रक्कमही शुभमच्या हवाली केली.