शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय भरतीतील लाचखोरीची चौकशी

By admin | Updated: June 25, 2014 17:26 IST

पणजी : राज्यात अलीकडे झालेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीवेळी लाचखोरी झाल्याची चर्चा गावोगावी अजूनही सुरू आहे. मात्र, सरकारने नेमक्या एका निनावी तक्रारीची गंभीरपणे

पणजी : राज्यात अलीकडे झालेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीवेळी लाचखोरी झाल्याची चर्चा गावोगावी अजूनही सुरू आहे. मात्र, सरकारने नेमक्या एका निनावी तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली व त्या तक्रारीची पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागामार्फत चौकशीही करून घेतली. चौकशीवेळी लाचखोरीच्या आरोपात तथ्य आढळून आले नाही, असे पोलीस अहवालातून स्पष्ट होत आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीवेळी काहीजणांना गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळाल्या, तर काहीजणांना अन्य विविध कारणास्तव नोकऱ्या मिळाल्याची चर्चा सर्वत्र गेले काही महिने सुरू आहे. पोलीस खात्याने काही उपनिरीक्षकांची निवड केल्यानंतर त्यापैकी काहीजणांच्या पार्र्श्वभूमीबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्या. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासह इतरांनीही पीएसआय भरतीवर टीका केली. त्यानंतर सरकारने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या शंभरहून जास्त उमेदवारांपैकी सहाजणांना प्रशिक्षणासाठी गुजरातमध्ये पाठविले नाही. त्या सहाजणांची पार्र्श्वभूमी तपासून पाहण्याचे काम त्यानंतर सुरू झाले. उर्वरित गोव्याचे उपनिरीक्षक प्रशिक्षणासाठी गुजरातमध्ये आहेत. तथापि, योगेंद्र गारुडी या ओबीसी विभागातून निवड झालेल्या शिवोली मतदारसंघातील उमेदवाराबाबत सरकारजवळ २३ सप्टेंबर २०१३ रोजी तक्रार आली. या तक्रारीवर कुणीच सही केलेली नाही किंवा त्या तक्रारीवर नावही नाही. तक्रारीची प्रत माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाली आहे. योगेंद्र गारुडी हा भ्रष्ट मार्र्गाने पीएसआय म्हणून निवडला गेला, अशा प्रकारचा आरोपही तक्रारीत होता. लाचखोरी झाल्याची अफवा असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची सरकारने दखल घेतली व पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागास चौकशी करण्यास सांगितले. ५ मार्च २०१४ रोजी या विभागाने सखोल चौकशी काम पूर्ण करून सरकारला अहवाल सादर केला. पोलीस निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांच्या सहीने अहवाल तयार केला गेला. गारुडी याच्याविरुद्ध २०११ साली केवळ एक अदखलपात्र तक्रार (एनसी) शिवोली पोलिसांत नोंद झालेली आहे. मात्र, त्याने लाच दिल्याने त्याची पोलीस भरतीवेळी निवड झाली हा आरोप मोघम वाटतो, त्यास पुष्टी देणारा पुरावा नाही व त्या आरोपास आधारही नाही, असे मिनेझिस यांनी अहवालात म्हटले आहे. माहिती हक्क कायद्याखाली अहवालाची प्रतही मिळाली आहे. (खास प्रतिनिधी)