शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

५.२३ लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचे संरक्षण

By admin | Updated: February 17, 2015 02:26 IST

पणजी : राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, असे लक्ष्य नागरी पुरवठा खात्याने

पणजी : राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, असे लक्ष्य नागरी पुरवठा खात्याने आखलेले आहे. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी रेशनकार्डांच्या डिजिटलायझेशनचे काम होणे आवश्यक असून आता तालुका व ग्रामपातळीवर काम सुरू करण्यात येणार आहे. राज्यात रेशनकार्डांचे डिजिटलायझेशन होणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कुटुंबांना योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात रेशनचे धान्य उपलब्ध होईल. राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस रेशनकार्डे आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, एका घरात तीन ते चार रेशनकार्ड करण्यात आली आहेत. लग्नापूर्वी पालकांच्या रेशनकार्डवर नावे आहेत. तर लग्नानंतर वेगळे रेशनकार्ड करूनही दोन रेशनकार्डवर नावे आहेत. त्यामुळे एका घरात एका व्यक्तीला दोन रेशनकार्डद्वारे धान्य जाते. काही नागरिक विदेशी किंवा इतर राज्यांत स्थायिक आहेत. मात्र, त्यांच्या नावाचे रेशनधान्य उचलले जाते. डिजिटलायझेशन प्रक्रियेनंतर ही गफलत होणार नाही. तसेच आवश्यक नागरिकांना आवश्यक रेशनधान्य देता येईल. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना रेशनधान्याचा लाभ घेता यावा, असे काम केले जाईल. यासाठी प्रामुख्याने जनतेकडून सहकार्य मिळण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा योजनेतंर्गत ३ रुपये किलो तांदूळ, २ रुपये किलो गहू आणि १ रुपये किलो दराने साखर नागरिकांना मिळेल, असे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)