लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथील लईराई २१ एप्रिलला होणार असून जत्रोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद कारबोटकर यांच्यासह शिष्टमंडळाने शिरगाव येथे जत्रोत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
या शिष्टमंडळाने देवस्थान समितीशी चर्चा करून भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे, सुविधा व सुरक्षा व्यवस्था याचा आढावा घेतला. जत्रोत्सव यशस्वीपणे पार पाडावा, यासाठी भाजप कार्यकर्ते सर्वतोपरी सहकार्य करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवस जत्रा नेटकी व सुरळीत पार पाडावी यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते प्रशासन व देवस्थान समितीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नमूद केले.
भाविकांनी शिस्त पाळून जत्रोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी सहकार्य करावे तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी देवस्थान अध्यक्ष दीनानाथ गावकर व इतर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Summary : Preparations for Shirgaon's Lairai Jatra on April 21st are in full swing. BJP leaders, including Damu Naik, reviewed arrangements, ensuring smooth darshan, facilities, and security. BJP workers pledged full cooperation for the festival's success, urging devotees to follow guidelines.
Web Summary : शिरगाँव में 21 अप्रैल को होने वाली लईराई जत्रा की तैयारियाँ जोरों पर हैं। दामू नाइक सहित भाजपा नेताओं ने सुचारू दर्शन, सुविधाओं और सुरक्षा सुनिश्चित करते हुए व्यवस्थाओं की समीक्षा की। भाजपा कार्यकर्ताओं ने त्योहार की सफलता के लिए पूर्ण सहयोग का संकल्प लिया, भक्तों से दिशानिर्देशों का पालन करने का आग्रह किया।