शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पक्षपातीच

By admin | Updated: May 27, 2014 01:35 IST

पणजी : यापूर्वी सरकारमधील अनेक मंत्र्यांविरुद्ध व सत्ताधार्‍यांशीसंबंधित राजकारण्यांविरुद्ध आपण दिलेल्या तक्रारी पोलिसांनी नोंद केल्या नाहीत;

पणजी : यापूर्वी सरकारमधील अनेक मंत्र्यांविरुद्ध व सत्ताधार्‍यांशीसंबंधित राजकारण्यांविरुद्ध आपण दिलेल्या तक्रारी पोलिसांनी नोंद केल्या नाहीत; पण चोडणकर प्रकरणी मात्र तत्काळ तक्रार नोंद करून पोलीस चौकशी काम करू लागले, असे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांचे म्हणणे आहे. आमदार विजय सरदेसाई, अ‍ॅड. रॉड्रिग्ज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत, आयटी तज्ज्ञ समीर केळेकर व इतरांनी मोहन व मिश्रा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर चोडणकर यांची बाजू मांडली. चोडणकर प्रकरणी चौकशी अधिकार्‍याने अतिउत्साह दाखवला आहे. चोडणकर हे गोव्याबाहेर नोकरी करत असून ते कार्यालयीन कामासाठी दौर्‍यावर गेल्याने त्यांना गोव्यात येण्यास पंधरा दिवस लागतील, असे चोडणकर यांच्या वडिलांनी पोलिसांना कळविले होते. तरीही पोलिसांनी लगेच दुसरे समन्स बजावले. आमच्याविरुद्ध यापूर्वी भाजपवाल्यांनी फेसबुकवरून बदनामीची मोहीम चालवली; पण पोलिसांनी कधीच कारवाई केली नाही, असे सरदेसाई म्हणाले. मी पोलिसांकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. ती नोंदवून घ्यावी की नाही हे ठरविण्यासाठी पोलीस फाइल काढून पर्रीकर यांच्याकडेच पाठवतात, असे अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांनी मोहन यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. चोडणकर यांची बाजू घेऊन आंदोलन करत आहेत, त्यापैकीच काहीजणांनी देऊच्या नावाने स्वत: फेसबुकवर टिप्पणी केलेली असू शकते, असे विधान भाजपाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. पोलिसांनी या विधानाची दखल घेऊन सावंत यांनाही अटक करावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. (खास प्रतिनिधी)