शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

गोव्यात पेट्रोल- डिझेल 70 रुपये प्रति लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 10:26 PM

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इंधन दरात वाढ

पणजी: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर प्रत्येकी अडीच रुपयांनी वाढला आहे. पेट्रोलडिझेल जवळजवळ 70 रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल पंप व्यावसायिकांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच वाढीव दर आकारणी सुरू केली. डिझेल दर वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.गेल्या महिन्यातच गोवा सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) वाढवला होता. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते. यावेळी पुन्हा केंद्र सरकारने अर्थ संकल्पातून इंधनावरील अबकारी कर व अधिभाराचे प्रमाण वाढवले. यामुळे राज्यात पेट्रोलचा दर शनिवारी प्रति लिटर 69 रुपये 3 पैसे असा झाला आणि डिझेलचा दर 69 रुपये 46 पैसे झाला. पेट्रोल व डिझेलचे दर अलीकडे वाढत गेल्याने गोवा सरकारच्या तिजोरीत महसुलाची भर पडली आहे. डिझेलचे दर वाढल्यानंतर बस वाहतूक महाग होते. तसेच सगळीच वाहतूक महागल्याने भाजीपाल्याचेही दर वाढत असतात. केंद्रीय अर्थसंकल्प हा त्यादृष्टीने महागाई वाढवणाराच ठरेल, अशी प्रतिक्रिया गोमंतकीयांमध्ये व्यक्त होत आहे. पूर्वी गोव्यात पेट्रोलचा दर हा अन्य राज्यांपेक्षा खूप कमी होता. आता मात्र हा दर वाढत चालला आहे. गोवा सरकार सध्या दरमहा 100 कोटी रुपयांचे कर्ज घेऊ लागले आहे. रोखे विक्रीस काढून गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा कर्ज घेतले गेले. शनिवारीही रोखे विक्रीस काढल्याची अधिसूचना जारी झाली आहे. सातत्याने रोखे विक्रीस काढून हा निधी विकास कामांसाठी वापरला जात असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातच तशी तरतूद केलेली आहे असेही सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल