शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 5:58 PM

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली.

पणजी : तीन दिवस कांदोळीच्या खासगी इस्पितळात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स) ह्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली.

पर्रीकर यांचे शरीर फक्त पातळ पदार्थ स्वीकारत आहे. अन्य पदार्थ पचत नाहीत, अशी तक्रार असल्याची माहिती मिळते. अगोदर त्यांनी कांदोळी येथील इस्पितळात उपचार घेतले पण फार सुधारणा झाली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पर्रीकर यांनी शुक्रवारी संपर्क साधला होता. शहा यांनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना दिल्लीतील एम्स संस्थेत दाखल व्हावे, असा सल्ला दिला होता. त्यानुसार एम्स संस्थेत जाण्याचा निर्णय पर्रीकर यांनी शुक्रवारी रात्री घेतला. पर्रीकर यांच्यासाठी केंद्र सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हे विमान गोव्याहून दिल्लीला निघाले. दुपार पर्यंत पर्रीकर एम्स इस्पितळात दाखल झाले. पर्रीकर यांच्या एम्समध्ये विविध चाचण्या केल्या जात आहेत. 

एम्समधील जुन्या खासगी वॉर्डमध्ये ते असल्याचे सांगण्यात आले. पर्रीकर हे गेले काही महिने सातत्याने विविध इस्पितळांत उपचार घेत असून तीनवेळा ते अमेरिकेला जाऊन आले. दोनवेळा ते मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. गोव्यात कधी गोमेकॉ इस्पितळात तर कधी खासगी इस्पितळात त्यांना दाखल व्हावे लागले. त्यांच्या आरोग्याविषयी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही चिंता आहे. पर्रीकर बरे होऊन यावेत, अशी प्रार्थना भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. 

मंत्र्यांना अतिरिक्त खाती मिळणारपर्रीकर एम्समध्ये दाखल झाल्यानंतर गोव्यातील राजकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांच्या मते पर्रीकर हे त्यांच्याकडील महत्त्वाची अतिरिक्त खाती सर्व मंत्र्यांमध्ये वितरित करणार आहेत. पर्रीकर यांनी शनिवारी आपल्याला व सभापती प्रमोद सावंत यांना तसे सांगितले असल्याचे लोबो म्हणाले. लोबो यांनी जाहीरपणो तसे विधान केल्याने अन्य सगळे मंत्री आता आपल्याला कोणते अतिरिक्त खाते मिळेल याकडे लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीgoaगोवाHealthआरोग्य