शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत इमारतींमुळे विकासाला वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:25 IST

मोर्ले व केरी पंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : राज्यातील विकास ही न थांबणारी आणि सातत्याने पुढे जाणारी प्रक्रिया आहे. ती अधिक वेगाने राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सुसज्ज पंचायत इमारतींमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मोर्ले व केरी पंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या नवीन पंचायत इमारती व सभागृहांचे उद्घाटन काल शनिवारी झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, समाज कल्याणमंत्री आमदार डॉ. दिव्या राणे, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, इतर पंच सदस्य, केरी सरपंच नंदीता गावस, दिक्षा गावस, इतर पंचायतीचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आदी उपस्थित होता. नव्या इमारती मिळाल्याने स्थानिकांन समाधान व्यक्त केले.

'सर्वांगीण विकासासाठी योजना'

भाजपाचे सरकार अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्त्वांवर आधारित कार्य करत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नवभारत' संकल्पनेनुसार गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मोर्ले पंचायतीसाठी सुमारे ६० लाख रुपये पंचायत निधीतून खर्च करण्यात आले असून केरी पंचायतीसाठी दीनदयाळ योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी वापरून सुसज्ज इमारत व वातानुकूलित सभागृह उभारण्यात आले आहे.

या सुविधा स्थानिक नागरिकांसाठी विशेषतः युवक व महिलांसाठी उपयुक्त ठरणार असून रोजगाराभिमुख उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी येथे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डबल इंजिन सरकारमुळे पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला अधिक गती मिळत असल्याचेही मुख्यमंत्री नमूद केले. आमदार दिव्या राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही इमारती पंचायतींना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Panchayat Buildings Accelerate Development: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant inaugurated new panchayat buildings in Morle and Keri, emphasizing their role in boosting rural development. He highlighted the government's commitment to reaching the last person through various schemes, with the new facilities supporting employment and women's empowerment. The buildings were dedicated on MLA Divya Rane's birthday.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत