शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पब’ला विरोध करणाऱ्यांचे

By admin | Updated: July 15, 2014 01:14 IST

पणजी : पब संस्कृतीला विरोध करणाऱ्या भाजप, तसेच मंत्र्यांचे कॅसिनोंना समर्थन कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला आहे.

पणजी : पब संस्कृतीला विरोध करणाऱ्या भाजप, तसेच मंत्र्यांचे कॅसिनोंना समर्थन कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला आहे. याबाबतीत भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेले दोन आठवडे पब संस्कृतीच्या वृत्तांनी जगभरात गोव्याबाबत चुकीचा संदेश गेला आहे. आधी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व पाठोपाठ केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पब संस्कृतीविरोधात भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. गोवा जगभरात नाईट लाईफ, बार व पबसाठी प्रसिद्ध आहे. श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्रकारांनी कॅसिनोचा विषय उपस्थित केला असता, हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट करून त्यांनी हात झटकले होते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने कॅसिनोंबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे. भाजपचे आमदार, मंत्री विदेशवाऱ्या करतात. अलीकडे तर पाचजण ब्राझील दौरा करून आले. विदेशी संस्कृतीविरुद्ध नाक मुरडणाऱ्यांना विदेश दौरे कसे चालतात, असा सवाल त्यांनी केला आहे. २0१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकरांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने तर कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे उघड केले आहे. गेल्या वर्षी सालभरात ३0४८ कोटी रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाली आणि चोरीचा माल हस्तगत करण्याचे प्रमाण केवळ 0.१ टक्के इतके आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. गृह खाते पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे यातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)