शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक शाळेत दोन शिक्षक

By admin | Updated: June 15, 2015 01:30 IST

कमी पटसंख्येमुळे एकशिक्षकी बनलेल्या २८० सरकारी प्राथमिक शाळा आता दोन शिक्षकी बनणार आहेत. नवीन निवडण्यात आलेल्या शिक्षकांतून या

कमी पटसंख्येमुळे एकशिक्षकी बनलेल्या २८० सरकारी प्राथमिक शाळा आता दोन शिक्षकी बनणार आहेत. नवीन निवडण्यात आलेल्या शिक्षकांतून या विद्यालयांना शिक्षक पुरविले जातील. शिक्षण खात्याने हाती घेतलेली इंग्रजी शिक्षक पदांची भरती ही एकशिक्षकी विद्यालयांच्या पथ्यावर पडली आहे. ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी तूर्त २७५ शिक्षकांना निवडण्यात आले आहे. या शिक्षकांपैकी बहुतेक शिक्षकांना या विद्यालयांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली. नवीन शिक्षक भरती ही मुख्यत: इंग्रजी विषय शिकविण्यासाठी करण्यात आली होती. तसेच एका शिक्षकाला एकापेक्षा अधिक शाळांत शिकवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. या मूळ धोरणात थोडासा बदल करण्यात येणार आहे. शिक्षकांना एकापेक्षा अधिक विद्यालयांत शिकवावे लागणारच आहे; परंतु वेळापत्रक ठरविताना एकशिक्षकी शाळा या दोन शिक्षकी शाळा होतील याची काळजी घेण्यात येणार आहे. एकशिक्षकी शाळांत एकाच शिक्षकाला पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व चारही वर्ग घ्यावे लागतात. एकाच वेळी चार वर्गांवर लक्ष देणे हे शक्य नसल्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कमी विद्यार्थी असलेल्या शाळांचे विलिनीकरण करून त्या शाळेत दोन शिक्षक देण्याची योजना शिक्षण खात्याने बनविली होती. ही योजना शेवटपर्यंत योजनाच राहिली असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. परंतु नव्याने भरती केलेले शिक्षक या शाळांना मिळणार असल्यामुळे ही समस्या तूर्त सुटली आहे.