गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 08:21 PM2020-10-05T20:21:07+5:302020-10-05T20:22:48+5:30

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

No Coal movement in Goa, spontaneous support in Madgaon-Fatorda | गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

Next

मडगाव - गोव्यात सुरू झालेल्या कोळशा विरोधातील आंदोलनाला सासष्टीत चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या आंदोलनाला गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा दिला असून सोमवारी या रॅलीत आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पना आपल्या पक्षाचा विरोध असेल असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी दुपारी हे आंदोलन सुरू केलेल्या 'गोयांत कोळसो नाका' या संघटनेच्या पदधिकाऱ्यानी  विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक हे सांगणारे निवेदन दिले.

ही रॅली फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून बोर्डा  मार्गे आल्यानंतर मडगाव येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात तिची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतूकीला गोवा राज्यातून  निषेध करण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक गावात जागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन  केले आहे.

याची सुरुवात गिर्दोली चांदर पासून  त्यांनी केली होती. या नंतर गोव्यातील प्रत्येक गावात ही रॅली जाणार असून या दरम्यान या प्रकल्पा पासून गोव्यातील वन संपदा नष्ट होईल तसेच पर्यावरण हानी होणार असल्याचे लोकांना सांगण्यात येणार असल्याचे या संघटनेचे संयोजक आंतोनियो डिसिल्वा यांनी सांगितले.

पुढे ते बोलताना म्हणाले की ही कुठलीही राजकीय चळवळ नाही. आम्ही या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला कुठलाही फायदा नाही. या प्रकल्पामुळे कोळसा रेल्वे मार्गावरून कर्नाटक येथे जाणार आहे. या रेल्वेच्या प्रकल्पा बद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी गोव्यातील जनतेला अंधारात ठेवले आहे.

चांदर येथील फेलिक्स फुर्तादो यांनी सांगितले की या रेल्वे वाहतुकीत हरित गोव्याचे  अस्तित्व धोक्यात येणार आहे. या रेल्वेतून दर दिवशी कोळसा वाहतूक होणार आहे. या दरम्यान उडणारे कण सभोवतीच्या परिसरात पसरणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे असल्याचे शेवटी त्याने सांगितले.

 

Web Title: No Coal movement in Goa, spontaneous support in Madgaon-Fatorda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा