शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीपूर्वीच खाण कंपन्या निर्दोष ठरण्याचा धोका

By admin | Updated: October 29, 2014 01:07 IST

पणजी : ‘कंडोनेशन आॅफ डिले’ हा गुन्हा आहे की नाही, याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने खाण खात्याला पाठविले आहे.

पणजी : ‘कंडोनेशन आॅफ डिले’ हा गुन्हा आहे की नाही, याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने खाण खात्याला पाठविले आहे. खात्याने हा गुन्हा नाही, असे सांगितल्यास एम. बी. शहा आयोगाने ठपका ठेवलेल्या सर्व खाण कंपन्या या तपासापूर्वीच निर्दोष ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीकडून तसे पत्र मिळाल्याची माहिती खाण खात्यातील सूत्रांकडून देण्यात आली. ‘कंडोनेशन आॅफ डिले’ हा गुन्हा ठरतो आहे की नाही, याबद्दल सविस्तर माहिती एसआयटीने मागितली असली, तरी अद्याप खाण खात्याकडून त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. एसआयटीला उत्तर देण्यापूर्वी सरकारशी या बाबतीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती खाण खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. ‘कंडोनेशन आॅफ डिले’ हा कायद्याने गुन्हा नसल्याचा निर्वाळा खाण खात्याने दिला, तर एसआयटीच्या रडारवरून खाण कंपन्या आपोआप बाहेर पडणार आहेत. केवळ बोगस परवाने किंवा रॉयल्टी न फेडण्याच्या प्रकरणात एसआयटी तपास करू शकणार आहे. खाण घोटाळा प्रकरणातील चौकशी केवळ शहा आयोगाच्या अहवालाला अनुसरून करण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी म्हटले होते. त्यामुळे कंडोनेशन आॅफ डिलेचा ठपका ठेवण्यात आलेल्या खाण कंपन्यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवून कंडोनेशन आॅफ डिले हा गुन्हा नसल्याचा निर्णयही सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.