शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खाणी लवकर अशक्यच

By admin | Updated: March 16, 2015 01:42 IST

पणजी : ८९ खाण लिजधारकांना केंद्राकडून लवकरच पर्यावरणीय परवाने मिळवून देऊन खाणी पूर्ववत सुरू करण्याचे सरकारचे आश्वासन

पणजी : ८९ खाण लिजधारकांना केंद्राकडून लवकरच पर्यावरणीय परवाने मिळवून देऊन खाणी पूर्ववत सुरू करण्याचे सरकारचे आश्वासन निव्वळ जिल्हा पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मते प्राप्त करण्यासाठीच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी, अर्थतज्ज्ञ तसेच इतर घटकांकडून होत आहे. आणखी दीड वर्ष तरी खाणी सुरू होणे अशक्यच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मायनिंग पीपल्स फ्रंटनेही या आश्वासनाचा धिक्कार केला आहे. बेकायदा खाणींविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन लढा दिलेले गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड अल्वारिस म्हणाले की, याआधी पर्रीकरांनीही अनेकदा अशीच आश्वासने दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये काही मर्यादा आणि अटी घालून खाणी सुरू करण्याचा आदेश दिला आहे. वर्षभर काहीच होऊ शकले नाही. खाणींच्या बाबतीत यापुढे वाकडे काहीच चालणार नाही, जो योग्य पद्धतीने सर्व कायदे पाळून परवाने घेईल त्यालाच खाणी सुरू करता येतील. झटपट ते शक्यच नाही, त्यासाठी बराच कालावधी जाईल. आम्ही कायदेशीर खाणींच्या विरोधात नाही; परंतु बेकायदा कोणी काही केले तर ते मात्र आता लोकही खपवून घेणार नाहीत. सरकार खाणी सुरू करण्यास जेवढी उत्सुकता दाखवते, तितकीच उत्सुकता खाण व्यवसायात ज्यांनी घोटाळे केले त्यांच्यावर कारवाईबाबत का दाखवत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राणे व कामत सरकारने विलंबाची माफी दिलेल्या आणि वादात असलेल्या ४0 पैकी काही खाण लिजांचे नूतनीकरण कसे केले, असा प्रश्नही त्यांनी केला. आश्वासन निवडणुकीतील गाजर गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने हे आश्वासन म्हणजे निवडणुकीत गाजर दाखवण्याचा प्रकार आहे, अशी टीका करून संभावना केली आहे. लोकांना सरकारने मूर्ख बनवू नये, असे निमंत्रक सुहास नाईक म्हणतात. मेरशी येथे लोकसभा निवडणुकीआधी मोदींच्या जाहीर सभेत असेच आश्वासन दिले होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्रात भाजपची सत्ता येऊन १0 महिने उलटले तरी काहीच होऊ शकलेले नाही. (पान २ वर)