शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खाणी दीड वर्ष सुरू होणे अशक्य

By admin | Updated: October 3, 2014 01:14 IST

व्यावसायिकही नाराज : लिज धोरणात स्पष्ट रोडमॅपचा अभाव, मसुदा आता पाठविणार अर्थ व कायदा खात्याकडे

पणजी : राज्यातील खाणी दीड वर्षभर सुरू होणे जवळजवळ अशक्य आहे. सरकारच्या लिज धोरणावर खाण व्यावसायिकही खुश नाहीत. खाणी सुरू करण्यासाठी स्पष्ट असा रोडमॅप लिज धोरणात नाही, अशा प्रकारची भावना खनिज व्यावसायिक व्यक्त करत आहेत. मंत्रिमंडळाने बुधवारी गोवा खनिज लिजेस धोरणाचा मसुदा मंजूर केला. यापुढे या मसुद्याची कायदा खाते छाननी करणार आहे. राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांकडून मंजुरी घेऊन हा मसुदा मंत्रिमंडळासमोर मांडला होता. कायदा खात्याकडे तो पाठवला नव्हता. मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव आणण्यापूर्वी अर्थ खात्याकडूनही यास मंजुरी घेतली नव्हती. कायदा व अर्थ खात्याकडे मसुद्याची प्रत पाठवली गेली असती, तर कोणत्याही स्तरावर मसुद्यातील तरतुदींबाबतची माहिती बाहेर फुटली असती. तो ‘धोका’ टाळण्यासाठी मसुदा थेट मंत्रिमंडळासमोर आणल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता हा मसुदा अर्थ व कायदा खात्याकडे पाठवला जाणार असल्याचे सरकारने बुधवारी स्पष्ट केले आहे. खाणी लवकर सुरू होण्यासाठी जो रोडमॅप धोरणात असायला हवा होता, तो मुळीच दिसत नाही, अशी प्रतिक्रिया खनिज निर्यातदारांपैकी काहीजणांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ अर्जदारांना खाणी लवकर सुरू झालेल्या हव्या आहेत. गेल्या वर्षी सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कागदपत्रे ठीक असल्याचे मानून सरकारने स्टॅम्प ड्युटी स्वीकारली होती. मग आता मिनरल कन्सेशन्स नियम ३७ व ३८ अन्वये नोटिसा पाठवून सुनावणी वगैरे घेण्याची पद्धत का अवलंबिली, असा प्रश्न अर्जदारांपैकी काहीजण उपस्थित करत आहेत. आपले अर्ज फेटाळले जातील या भीतीपोटी निर्यातदार व अर्जदार उघड बोलत नाहीत; पण लिज धोरण समाधानकारक नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. सरकारने आम्हाला लिज नूतनीकरण करून देणार, अशी हमी देऊन स्टॅम्प ड्युटी भरून घेतली. आमचे तीनशे-चारशे कोटी रुपये वापरले व आता आमची छाननी केली जात आहे. म्हणजे ही फसवणूक आहे, अशी प्रतिक्रिया एका अर्जदाराने व्यक्त केली. गोंधळ आणखी वाढला : मेलवानी सरकारला सुधारित खाण धोरणाद्वारे अनेक प्रश्न व वाद सोडविण्याची चांगली संधी होती; पण सरकारचे नवे लिज मंजुरी धोरण पाहता गोंधळ आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया खनिज व्यावसायिक हरीष मेलवानी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अगोदरच्याच अर्जदारांना पुन्हा खाणी देण्याच्या पद्धतीबाबत एनजीओ व अन्य घटकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. नवे लिज धोरण ठरविण्यापूर्वी सरकारने खाणमालकांशी किंवा एनजीओंशीही चर्चा केली नाही. खाण व्यवसाय सुरू व्हावा म्हणून लिज धोरणात स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्त्वेच (पान २ वर)