शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

म्हादईचा तिढा वाढला, उत्तर कर्नाटकात उद्या बंद, गोवा सरकार संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 23:35 IST

म्हादई पाणीप्रश्नी सध्या गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमधील तिढा आणखी वाढला आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतक-यांनी म्हादईचे पाणी वळवून ते मलप्रभेत सोडावे व त्याचा पुरवठा शेतक-यांसाठी केला जावा म्हणून आंदोलन चालवले आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी सध्या गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमधील तिढा आणखी वाढला आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतक-यांनी म्हादईचे पाणी वळवून ते मलप्रभेत सोडावे व त्याचा पुरवठा शेतक-यांसाठी केला जावा म्हणून आंदोलन चालवले आहे. आज उत्तर कर्नाटकामध्ये बंद पाळला जाणार आहे. त्यामुळे गोव्याहून धारवाडच्या भागात कदंब बसगाडय़ा आज सोडल्या जाणार नाहीत. तथापि, म्हादई पाणीप्रश्नी गोमंतकीयांच्या भावना संतप्त असल्याने गोवा सरकार सध्या संभ्रमात सापडले आहे.भाजपचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांनी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील शेतक-यांना म्हादईचे पाणी मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. दि. 15 डिसेंबर्पयत आपण म्हादईचे पाणी मिळवून देईन, असे येडीयुरप्पा यांनी म्हटले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही. यामुळे शेतकरी संतप्त बनले असून त्यांनी बंगळुरला भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन चालवले आहे. येडीयुरप्पा यांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्र लिहिले व पिण्यासाठी म्हादईचे पाणी द्यावे या मागणीबाबत चर्चा करण्याची तयारी दाखवली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्याला पत्र लिहावे, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हादईपाणी प्रश्नी जी काही चर्चा होईल ती कर्नाटकमधील निवडणुकीनंतरच असे यापूर्वी जाहीर केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या म्हादईचा वाद पेटला असून गोव्यातही सरकारच्या पत्रामुळे म्हादईच्या विषयाचे अभ्यासक, संशोधक, पर्यावरणप्रेमींसह उत्तर गोव्यातील अनेक लोकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गोव्यात नाताळ सण साजरा होत असताना म्हादईप्रश्नी जी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यास पर्रीकर यांनी कर्नाटकला दिलेले पत्र कारणीभूत ठरते, असे आम आदमी पक्षाने मंगळवारी म्हटले आहे. म्हादई नदीचे पाणी मिळावे म्हणून उत्तर कर्नाटकमध्ये आज बंद पुकारला गेल्याने त्या भागात गोव्यातील कदंब बसेस जाऊ शकणार नाहीत. 

बैठकीची कल्पना नाही- पर्रीकर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी येत्या 5 रोजी येडीयुरप्पा संपर्क साधतील व म्हादईप्रश्नी बैठक घेतील, अशा प्रकारची चर्चा पसरली आहे. याविषयी लोकमतने मुख्यमंत्री पर्रीकर यांना मंगळवारी विचारले असता, ती अफवा असल्याचे ते म्हणाले. आपल्याला तरी कोणत्याच प्रकारच्या बैठकीची कल्पना नाही, असे पर्रीकर यांनी सांगून वृत्त फेटाळले. पर्रीकर मंगळवारी गुजरातला गेले होते. ते रात्री परतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे म्हादईप्रश्नी येडीयुरप्पा यांच्या सातत्याने संपर्कात आहेत अशी चर्चा राष्ट्रीय स्तरांवरून येणा-या वृत्तांमधून सद्या पसरत आहे.दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक यांनी पर्रीकर यांच्या पत्रावर मंगळवारी टीका केली आहे. दोन राज्यांमधील लोकांमध्ये शत्रूत्वाची भावना पर्रीकर यांच्या पत्रामुळे वाढली आहे. नाताळ सणावेळी तरी अशी कडवट स्थिती नको होती. पर्रीकर यांनी म्हादईप्रश्नी केवळ राजकीय हेतूपोटी येडीयुरप्पा यांना पत्र देणो हा मोठा बेजबाबदारपणा आहे, असे आपने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा