‘कदंब’ची झाडाला धडक;

By Admin | Updated: June 17, 2014 17:49 IST2014-06-17T01:42:08+5:302014-06-17T17:49:48+5:30

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : पणजीकडे भरधाव वेगाने निघालेली कदंब बस चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळली.

'Kadamb' tree hit; | ‘कदंब’ची झाडाला धडक;

‘कदंब’ची झाडाला धडक;

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : पणजीकडे भरधाव वेगाने निघालेली कदंब बस चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळली. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात बसचालक मेल्वीन फर्नांडिस (वय ३७, रा. वळवणे-थिवी) यांच्यासह तिघेजण ठार झाले, तर वाहक रामनाथ दत्तू शेट (वय ५०, देळे) यांच्यासह २० प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींच्या किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर इस्पितळात पाठविले.
कोल्हापूर-पणजी बस (जीएओ ३ एक्स ०२३३) मध्यवर्ती बसस्थानकातून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुटली होती. ती कोल्हापूरहून बारा कि.मी.वर असलेल्या करवीर तालुक्यातील कोपार्डे-आडूर गावाच्या मध्यभागी आली असता, छोट्याशा
नागमोडी वळणावर चालकाचा स्टिअरिंंगवरील ताबा सुटला आणि
गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावर आदळली.

Web Title: 'Kadamb' tree hit;