शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल नव्हे : शांताराम नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 13:03 IST

केंद्र सरकारकडून येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल मानले जाऊ नये, अशी टीका करताना

पणजी : केंद्र सरकारकडून येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल मानले जाऊ नये, अशी टीका करताना माजी राज्यसभा खासदार तथा काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी हिन्दू महासभेने मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे गोडसेचे मंदिर उभारल्या प्रकरणी महासभेचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाईच्या मागणीचा पुनरुच्चार केला. 

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या शंभराव्या जयंतीदिनानिमित्त येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे करुन बांगलादेश निर्माण केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिराजींना दुर्गा असे संबोधले होते. मात्र आजकाल भाजपवाले काँग्रेसमध्ये होऊन गेलेल्या महान नेत्यांचे कार्य लपवून भलत्याच लोकांचे उदात्तीकरण करीत आहेत, असा आरोप शांताराम यांनी केला. 

ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसे याचे मंदिर बांधले जाते. या मंदिराला नगर नियोजन खात्याचा किंवा अन्य संबंधित खात्याचे परवाने मिळतातच कसे? असा सवाल करुन मुख्यमंत्री शिवराज चौहान हेही तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप शांताराम यांनी केला. गुजरातमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उदोउदो केला जातो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्वाल्हेरमध्ये गोडसेचे मंदिर बांधले आहे याची कल्पना नाही का?, असा प्रश्नही त्यांनी केला. ग्वाल्हेरप्रमाणे देशात सर्वत्र आता अशी मंदिरे येतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शांताराम पुढे म्हणाले की, इंदिराजींचे कार्य त्या काळी विरोधी नेतेही प्रामाणिकपणे मान्य करीत असत. हा प्रामाणिकपणा आजच्या भाजप नेत्यांमध्ये नाही.

गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, १९७0 च्या फाळणीवेळी इंदिराजींचे कौतुक झाले. परंतु आज या गोष्टीचे राजकारण केले जात आहे. इंदिराजी या ‘आयर्न लेडी’ म्हणून परिचित होत्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची वानरसेना सुरु केली. स्वातंत्र्यसैनिकांवर उपचार करण्याचे काम ही सेना करीत असे. पंतप्रधान बनल्यानंतर सुवर्णमंदिर कारवाई केली. आपल्या जिवाला धोका आहे हे माहीत असूनही त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले.’

पक्षाचे प्रदेश प्रधान सरचिटणीस आल्तिनो गोम्स, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा एजिल्दा सापेको, सैफुल्ला खान आदी नेत्यांची यावेळी भाषणे झाली. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी बाबी बागकर, विजय भिके आदी यावेळी उपस्थित होते. विजय पै यांनी आभार मानले. दरम्यान, अ‍ॅड. यतिश नायक यांची प्रदेश काँग्रेस समितीच्या कायदा विभागाच्या चेअरमनपदी तर फिलू डिकॉस्ता यांची काँग्रेसच्या असंघटित कार्यकर्ते विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणारा आदेश पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काढला आहे. रविवारी ही घोषणा करण्यात आली.