शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या पाकिस्तानी जावयाला भारत प्रवेश बंद; व्हिसा उल्लंघनासाठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 21:23 IST

पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा उल्लंघनासाठी त्याच्या देशात रवानगी केली आहे.

पणजी: गोव्याचा जावई असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा उल्लंघनासाठी त्याच्या देशात रवानगी केली आहे. पुन्हा त्याला भारताचा व्हिसा मिळू नये यासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे काही वर्षे त्याला भारत प्रवेश बंद झाला आहेमह्मद फैजल असे या पाकिस्तानी नागरिकाचे नाव असून त्याचा गोव्यात म्हापसा येथील शायना नावाच्या एका मुस्लीम युवतीशी विवाह झाला होता. तो १८ जुलै २०१९ रोजी गोव्यात आला होता.

भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला भारतात आल्यानंतर २४ तासात विदेश विभागाला त्याची माहिती देणे हे व्हिसा नियमानुसार बंधनकारक असते. याच अटीवर त्यांना व्हिसा दिला जातो. फैजल हा १८ जुलै रोजी गोव्यात आला होता, त्यामुळे २४ तासात त्याने विदेश विभागात नोंदणी करणे आवश्यक होते. परंतु तो विदेश विभागाकडे गेला २१ जुलै रोजी. म्हणजेच ३ दिवसांनी तो विदेश विभागात नोंदणीसाठी आला. 

व्हिसा नियामाचा त्याने भंग केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती गोव्याचे विदेश विभागाचे अधिक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली. फैजलला दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याची पाकिस्तानमध्ये रवानगी करण्यात आली. या कारवाईबरोबरच त्याला काळ््या यादीतही टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्याला काही वर्षे भारत प्रवेश बंद झाला आहे. त्याची पत्नी गोमंतकीय असल्यामुळे ती पाकिस्तानमधून भारतात येवू शकते, परंतु पतीला यायला मिळणार नाही. शायना व फैजल दोघीही आखाती देशात कामाला होती व तिथेच त्यांचा विवाह झाला होता. 

व्हिसा नियमाचे उल्लंघन करणाºयांना  काळ्या यादीत टाकण्याची कारवाई  केली जाते. गोव्यात त्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जात असल्याची माहिती बॉस्को जॉर्ज यांनी दिली. २०१९ वर्षात एकूण ५५ विदेशी नागरिकांना व्हिसा उल्लंघनासाठी काळ्या यादीत टाकण्यात आली. काळ्या यादीत टाकण्यात आलल्यात सर्वात अधिक १४ नागरीक हे युगांडाचे आहेत. त्यानंतर तांझानिया ९, रसिया ८, ब्रिटीश ५, युक्रेन ३ तर इतर देशातील ३३ नागरिकांचा समावेश आहे

टॅग्स :goaगोवाIndiaभारतpassportपासपोर्ट