शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी जावडेकरांशी बोललोय, दोन दिवसांत उत्तर येईल - प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:19 IST

म्हादई पाणीप्रश्नी मी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे.

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी मी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. दोन दिवसांत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची एक बैठक होईल व त्यावेळी काय तो निर्णय होईल व गोव्याला उत्तर येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये  म्हादई नदीच्या पाणी वाटपाच्या विषयावरून वाद आहे. कळसा भंडुरा प्रकल्पासाठी म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळविण्यास गोव्याचा आक्षेप आहे. यापूर्वी म्हादई पाणी तंटा लवादाने दिलेल्या निवाड्यालाही न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. गोव्याला अंधारात ठेवून अलिकडेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला पत्र दिले. कळसा भंडुरा प्रकल्पासाठी पाणी वळविण्यास केंद्राने कर्नाटकला मान्यता दिली. याबाबतची माहितीही मंत्री जावडेकर यांनीच ट्विटद्वारे जाहीर करताच गोव्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाची ही कृती आवडली नाही. विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली तर अनेक निमसरकारी संस्थांनी (एनजीओ) आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेले होते. या शिष्टमंडळाने दिल्लीत जावडेकर यांचीच भेट घेतली व कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेण्याची विनंती केली. जावडेकर यांनी आपल्याला त्या पत्रविषयी माहिती नव्हती, अधिका-यांनीच ते पत्र दिले असा युक्तिवाद केला. जावडेकर यांनी तत्पूर्वी स्वत:चे ट्विटही डिलीट केले. दहा दिवसांत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलय गोव्याच्या मागणीविषयी काय तो निर्णय घेईल, असे जावडेकर यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला सांगितले होते. कालच्या गुरुवारी दहा दिवसांची मुदत संपुष्टात आली. यामुळे गोव्यात विरोधकांनी पुन्हा टीका सुरू केली. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांना शुक्रवारी पत्रकारांनी विचारताच सावंत म्हणाले, की दहा दिवस शब्दश: मोजायचे नसतात याचे भान लोकांनी ठेवायला हवे. मी स्वत: जावडेकर यांच्याशी शुक्रवारी बोललो आहे. पुढील दोन दिवसांत दिल्लीत काय तो निर्णय होईल.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत