शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

फालेरोंचा किती टिकाव लागणार?

By admin | Updated: August 26, 2014 01:21 IST

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नियुक्ती होईल, अशी हवा तयार झालेली असली,

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नियुक्ती होईल, अशी हवा तयार झालेली असली, तरी प्रत्यक्षात फालेरोंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कितपत टिकाव लागेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. केंद्रात आणि गोव्यातही भाजपची सत्ता आहे. पर्रीकर सरकार अधिकारावर असल्याने फालेरो प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठीशी कामगिरी करूच शकणार नाहीत, असे काहींचे मत आहे. पर्रीकर जेव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले होते, त्या काळातही फालेरो हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्या वेळी प्रथम फालेरो यांनी पर्रीकर सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. नंतरच्या काळात पर्रीकरांनी फालेरोंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत फालेरो उद्योगमंत्री असताना झालेल्या काही व्यवहारांकडे बोट दाखविण्यास आरंभ केला होता. ईडीसीवर श्वेतपत्रिका काढण्याचे त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. झूब मोबोर येथील बेटावरील कथित अतिक्रमणाचा विषयही उपस्थित केला जात होता. नंतरच्या काळात फालेरो हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पर्रीकर सरकारशी संघर्ष करूच शकले नाहीत. आता पुन्हा फालेरो जर प्रदेशाध्यक्षपदी आले, तर ते स्वत:च्या पदास किती न्याय देऊ शकतील, हा खूप मोलाचा प्रश्न असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते. सुभाष शिरोडकर हे प्रदेशाध्यक्ष असतानाही शिरोडकर यांनी पर्रीकर सरकारशी संघर्ष टाळला होता. काँग्रेसमधील काहीजण त्या वेळी विषय आपल्यावर शेकेल म्हणून सुदीप ताम्हणकर वगैरे प्रवक्त्यांना खाणींच्या विषयावर बोलायलाच देत नव्हते. सध्या पर्रीकर सरकार राजकीयदृष्ट्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. या सरकारशी संघर्ष करण्याचे धैर्य जॉन फर्नांडिस यांच्याच नेतृत्वाखालील कार्यकारिणीने दाखवत ल्युसोफोनियासारखे अनेक घोटाळे उजेडात आणले आहेत. आता फालेरो प्रदेशाध्यक्षपदी आले, तर पुन्हा शिरोडकरांच्या काळातील काँग्रेस अनुभवास येईल, अशी राजकीय गोटातील चर्चा आहे. (खास प्रतिनिधी)पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नियुक्ती होईल, अशी हवा तयार झालेली असली, तरी प्रत्यक्षात फालेरोंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कितपत टिकाव लागेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. केंद्रात आणि गोव्यातही भाजपची सत्ता आहे. पर्रीकर सरकार अधिकारावर असल्याने फालेरो प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठीशी कामगिरी करूच शकणार नाहीत, असे काहींचे मत आहे. पर्रीकर जेव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले होते, त्या काळातही फालेरो हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्या वेळी प्रथम फालेरो यांनी पर्रीकर सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. नंतरच्या काळात पर्रीकरांनी फालेरोंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत फालेरो उद्योगमंत्री असताना झालेल्या काही व्यवहारांकडे बोट दाखविण्यास आरंभ केला होता. ईडीसीवर श्वेतपत्रिका काढण्याचे त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. झूब मोबोर येथील बेटावरील कथित अतिक्रमणाचा विषयही उपस्थित केला जात होता. नंतरच्या काळात फालेरो हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पर्रीकर सरकारशी संघर्ष करूच शकले नाहीत. आता पुन्हा फालेरो जर प्रदेशाध्यक्षपदी आले, तर ते स्वत:च्या पदास किती न्याय देऊ शकतील, हा खूप मोलाचा प्रश्न असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते. सुभाष शिरोडकर हे प्रदेशाध्यक्ष असतानाही शिरोडकर यांनी पर्रीकर सरकारशी संघर्ष टाळला होता. काँग्रेसमधील काहीजण त्या वेळी विषय आपल्यावर शेकेल म्हणून सुदीप ताम्हणकर वगैरे प्रवक्त्यांना खाणींच्या विषयावर बोलायलाच देत नव्हते. सध्या पर्रीकर सरकार राजकीयदृष्ट्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. या सरकारशी संघर्ष करण्याचे धैर्य जॉन फर्नांडिस यांच्याच नेतृत्वाखालील कार्यकारिणीने दाखवत ल्युसोफोनियासारखे अनेक घोटाळे उजेडात आणले आहेत. आता फालेरो प्रदेशाध्यक्षपदी आले, तर पुन्हा शिरोडकरांच्या काळातील काँग्रेस अनुभवास येईल, अशी राजकीय गोटातील चर्चा आहे. (खास प्रतिनिधी)