शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुसळधार! सर्वत्र पडझड, पूरस्थिती निर्माण, दोन दिवस रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 14:47 IST

मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.

नारायण गावस 

पणजी: राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. राज्यात हवामान खात्याने रविवार सोमवार रेड अलर्ट जारी केला असून लाेकांनी सर्तक राहण्याचा इशाराही खात्याने दिला आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनेही लोकांना मदतीसाठी नंबर जाहीर केला आहे. 

सर्वत्र पडझड सुरुच

राज्यात गेल्या आठवडाभर पाऊस सुरुच आहे. पण शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज रविवार सार्वजनिक सुट्टी असूनही मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांना घरापासून बाहेर पडता आले नाही. सर्व रस्त्यांवर  गुडघाभर पाणी भरले आहे. नद्यांची पातळी वाढली आहे. बहुतांश  ठिकाणी रस्ते पाण्यात  गेल्याने  अनेक वाहनांना याचा त्रास झाला. तसेच राज्यभर पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या.

धरणे नद्यांची पातळी भरली 

राज्यात मुसळधार पडत असलेल्या पावसाने धरणे नद्या भरल्या आहेत.  तिळारी तसेच अंजूणे धरण भरायला आल्याने या धरणातून आज रात्रीपर्यंत पाणी साेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी शेजारील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जलस्त्राेत खात्याकडून या धरणाच्या  पाण्याची पाहणी केली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची  पातळी वाढली असल्याने  राेद्र रुप धारण केले आहे.

आज उद्या रेड अलर्ट

राज्यात हवामान खात्याने  रविवार तसेच सोमवार रेड अर्लट जारी केला आहे. तसेच पुढील  दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या मुसळधार पावसाने माेठी हानीही केली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.  लाेकांच्या घराच्या भिंती कोसळून माेठी नुकसान झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्काली   न परिस्थिती ०८३२ -२४१९५५०, २२२५३८३, २७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस