शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या खाणप्रश्नी मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय - निर्मला सीतारामन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:52 IST

गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.वस्तू आणि सेवा करविषयक (जीएसटी) मंडळाची राष्ट्रीय बैठक गोव्यात सुरू आहे.देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्याचे सीतारामन यांनी जाहीर केले.

सदगुरू पाटील

पणजी - गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. शुक्रवारी (20 सप्टेंबर) गोवा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून उत्तर दिले आहे. वस्तू आणि सेवा करविषयक (जीएसटी) मंडळाची राष्ट्रीय बैठक गोव्यात सुरू आहे. त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भुषविण्यासाठी सीतारामन येथे दाखल झाल्या आहेत.

बैठकीला जाण्यापूर्वी सीतारामन यांनी पणजीतील कदंब पठारावरील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. देशात गुंतवणूक वाढावी आणि विदेशी गुंतवणुकीचेही प्रमाण वाढावे या हेतूने केंद्र सरकारने कोणते नवे प्रस्ताव आणले आहेत व मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनातून कोणते नवे निर्णय घेतले आहेत याविषयी सीतारामन यांनी माहिती दिली. केंद्रीय महसुल सचिव अजय पांडे हेही यावेळी उपस्थित होते.

देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. तसेच नव्या देशी उत्पादन कंपन्यांसाठी कराचे हे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत निश्चित केल्याचे व अन्य अनेक आर्थिक सवलतींची दारे खुली केल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्याचे हेतू यामुळे साध्य होतील. ज्या देशी कंपन्या अन्य कोणत्याच सवलती प्राप्त करणार नाहीत, त्यांना 22 टक्के दराने प्राप्ती कर भरण्याची मुभा असेल. यासाठी प्राप्ती कर कायद्यात नव्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन यांना यावेळी पत्रकारांनी गोव्यातील अर्थव्यवस्थाही डळमळीत झाल्याचे व खाण बंदीचा फटका बसल्याचे सांगत खनिज खाण धंदा कधी सुरू होईल असे विचारले असता, त्या म्हणाल्या की गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही हा विषय केंद्र सरकारसमोर मांडला आहे. केंद्राने मंत्र्यांचा जो गट स्थापन केला आहे, त्या गटाने गोव्याच्या खाणी सुरू करण्याच्या विषयात खूप रस घेतलेला आहे. मंत्र्यांचा गट एकूण विषयाबाबत गंभीरपणे विचार करत आहे.

गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपन्या आणि व्यावसायिकांना दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स घटवण्यासाठीचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून मंदीचा सामना करत असलेल्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वित्तमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे सकारात्मक पडसाद तात्काळ शेअर बाजारामध्ये उमटले असून, मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक सेंसेक्स मोठ्या प्रमाणात वधारला आहे. 

 

टॅग्स :Nirmal Singhनिर्मल सिंहgoaगोवाEconomyअर्थव्यवस्था