शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोंझाक रिबेलो मडगावचे नगराध्यक्ष

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

मडगाव : मडगावच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी गटाचे गोंझाक रिबेलो निवडून आले.

मडगाव : मडगावच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी गटाचे गोंझाक रिबेलो निवडून आले. विरोधी गटाचे सदानंद नाईक यांच्यावर त्यांनी १२ विरुद्ध ८ मतांनी विजय मिळविला. नगराध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर मडगावातील कचरा समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याबरोबरच मडगाव पालिकेची थकलेली कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिनविरोध निवडणूक होईल, असे संकेत मिळत होते. तर क्रॉस वोटिंग होऊन नाईक जिंकतील, अशी आशा विरोधकांना होती. प्रत्यक्षात झालेले क्रॉस वोटिंग रिबेलो यांच्या बाजूने झाले. सत्ताधारी गटाच्या नगरसेविकांची संख्या ११ होती. तरीही त्यांना एक मत जास्त प्राप्त झाले. साहाय्यक पंचायत संचालक राँकन परेरा हे या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या वेळी २० ही नगरसेवक उपस्थित होते. पहिल्या बारा मतांची रिबेलो व नाईक यांच्यात सहा-सहा अशी विभागणी झाली. मात्र, नंतर रिबेलो यांच्या बाजूने मतांची संख्या वाढली. रिबेलो यांना अकरावे मत पडल्यावर सत्ताधारी गटाने एकच जल्लोष केला. त्यानंतर प्रभारी नगराध्यक्ष धनंजय मयेकर यांनी रिबेलो यांना नगराध्यक्षपदाचा ताबा दिला. रिबेलो यांनी आपण महसुलाची थकबाकी वसूल करण्यावर भर देऊ असे स्पष्ट करताना घरोघर जाऊन कचरा उचलण्याची मोहीम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. मडगावकरांची कामे झटपट व्हावीत, यासाठी आपण कर्मचार्‍यांची बैठक घेऊन लोकांना ताटकळत ठेवू नका, अशा सूचना करणार असल्याचे सांगितले. या नगरमंडळाला भाजप सरकारचा पाठिंबा असल्याने विकासकामांसाठीही भरीव निधी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)